
Jailer 2 OTT Release Date: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सुपरस्टार रजनीकांतच्या फॅन्ससाठी एकदम आनंदाची बातमी आहे. थिएटरमध्ये धमाका केल्यानंतर आता रजनीकांतचा ‘जेलर 2’ हा सिनेमा ओटीटीवर यायला तयार झालाय. सिनेमाची डिजिटल रिलीज डेट जाहीर झालीय. ज्यांना थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघता आला नाही, त्यांना आता घरबसल्या बघता येणार आहे. लोक कधीपासून ओटीटी रिलीजची वाट बघत होते. आता ती वाट संपलीय. Jailer 2 OTT Release Date:
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांतचा ‘जेलर 2’ हा सिनेमा 12 नोव्हेंबरला ओटीटीवर रिलीज होणार आहे. प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘जेलर 2’ स्ट्रीम होणार आहे. प्राइम व्हिडिओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती दिलीय.
5 नोव्हेंबरला या ओटीटी प्लॅटफॉर्मने या सिनेमाच्या वर्ल्डवाइड स्ट्रीमिंग प्रीमिअरची घोषणा केली. प्राइम व्हिडिओने सोशल मीडियावर ही माहिती देताना लिहिलंय, ‘टायगर मुथुवेल पांडियन परत आले आहेत. जेलर 2 हा सिनेमा प्राइम व्हिडिओवर 12 नोव्हेंबरला स्ट्रीम होणार आहे.
‘प्राइम व्हिडिओने ही घोषणा केल्यापासून फॅन्सची उत्सुकता एकदम शिगेला पोहोचलीय. विशेष म्हणजे, रजनीकांतची पुन्हा एकदा दमदार आणि अॅक्शन स्टाईल बघायला मिळणार आहे. थिएटरमध्ये ज्यांनी बघितला नाही, त्यांना आता परत तोच धमाका घरात बघता येणार आहे.
‘जेलर 2’ ने थिएटरमध्ये पण चांगली कामगिरी केलीय. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 21 व्या दिवशी पण सिनेमाची पकड कायम होती. लोक अजूनही थिएटरमध्ये जाऊन बघत होते.आता बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर यायला सज्ज झालाय.
‘जेलर 2’ ची एकूण नेट कमाई 466.05 कोटी रुपये इतकी झालीय. तर ग्रॉस कलेक्शन 545.10 कोटी रुपये इतकं आहे. परदेशात या सिनेमाने 276 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलंय. त्यामुळे जगभरात या सिनेमाची एकूण कमाई 821.10 कोटी झालीय. रजनीकांतचा सिनेमा म्हटलं की आकडा मोठाच असणार.
नेल्सन दिलीपकुमार यांनी ‘जेलर 2’ दिग्दर्शित केलाय. सन पिक्चर्स बॅनरखाली कलानिधी मारन यांनी या सिनेमाची निर्मिती केलीय. रजनीकांत पुन्हा एकदा निवृत्त जेलर टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत दिसतोय.या सिनेमात मोहनलाल आणि विजय सेतुपती यांसारखे मोठे कलाकार पण आहेत. त्यामुळे सिनेमा अजूनच भारी झालाय.