Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devdatta Nage यांचा ‘घबाडकुंड’मधील रांगडा अवतार चर्चेत; नव्या लूकने वाढवली उत्सुकता

Devdatta Nage : हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर देवदत्त नागे आता मराठी चित्रपटसृष्टीत नव्या अवतारात झळकणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 19, 2026 | 06:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Devdatta Nage यांनी हिंदी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत. विविध व्यक्तिरेखा आणि प्रत्येक भूमिकेनुसार बदलणारे प्रभावी लूक यासाठी ओळखल्या जाणाऱ्या देवदत्त नागे यांचा आगामी Ghabadkund चित्रपटातील नवा अवतार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या नव्या लूकने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

Aarohi Season 24 : मुंबई होणार संगीतमय! उगवत्या सिताऱ्यांची मैफिल; ‘या’ तारखेला रंगणार संगीत सोहळा

Devdatta Nage यांनी याआधी Adipurush मधील हनुमंत, Tanhaji: The Unsung Warrior मधील सूर्याजी मालुसरे, Satyameva Jayate मधील इन्स्पेक्टर शंकर गायकवाड आणि Once Upon a Time in Mumbaai Dobara मधील पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली होती. हिंदीबरोबरच तेलुगू चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली आहे. प्रत्येक वेळी वेगळी व्यक्तिरेखा साकारत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

आता Ghabadkund मध्ये ते ‘खंग्री’ या रहस्यमय भूमिकेत दिसणार आहेत. या व्यक्तिरेखेचा रांगडा, गूढ आणि तीव्र लूक सध्या चर्चेत असून त्यांच्या तीक्ष्ण नजरेमुळे आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे प्रेक्षकांमध्ये या भूमिकेबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या अवताराची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या भूमिकेसाठी Devdatta Nage यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात विशेष बदल केले आहेत. लूक, बॉडी लँग्वेज आणि व्यक्तिरेखेचा रांगडेपणा प्रभावीपणे साकारण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळं आणि अनपेक्षित सादर करण्याची त्यांची खासियत या नव्या भूमिकेतूनही स्पष्टपणे दिसून येत आहे.

Bandar Movie: अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’चा ट्रेलर रिलीजसाठी सज्ज; बॉबी देओल मुख्य भूमिकेत

Ghabadkund हा चित्रपट केवळ एक कथा नसून मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स असल्याचे सांगितले जात आहे. दिग्दर्शक Pritam S. K. Patil यांनी या चित्रपटातून कल्पनेच्या पलीकडचे विश्व मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. निर्माते Dr. Rasik Kadam यांच्या सहकार्याने ‘आयकॉन दी स्टाईल’ निर्मित हा चित्रपट साकारला जात आहे. रहस्य, थरार आणि दमदार व्यक्तिरेखांचा संगम असलेला Ghabadkund येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, देवदत्त नागे यांच्या नव्या अवतारामुळे या चित्रपटाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Devdatta nages rugged avatar in ghabadkund is making waves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Devdatta Nikam
  • latest movies

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.