Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Wowww… धमाल 4 मध्ये Namrata Sambherao!’ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ची लॉली, बॉलिवूडमध्ये करणार धमाल

Namrata Sambherao : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री Namrata Sambherao आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ती आगामी Dhamaal 4 या चित्रपटात छोट्या पण लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये नम्रताची झलक पाहायला मिळाली असून ती भुताचे पात्र साकारत असल्याचे दिसते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 13, 2026 | 07:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री नम्रता संभेराव Bollywood मध्ये पदार्पण करणार आहे.
  • महाराष्ट्रात या सिनेमा संबंधित आणखीन एक नाव चर्चेत आले आहे.
  • धमाल 4 या सिनेमाच्या माध्यमातून एका लहान भूमिकेत चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या सुप्रसिद्ध मराठी कॉमेडी शोमध्ये आपल्या अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे कलाकार आता विविध मंचावर आपली कला सादर करत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारत भाग्य विधाता’ या सिनेमामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील सुप्रसिद्ध कलाकार ईशा डे झळकली आहे. अशामध्ये मराठी प्रेक्षकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राची शोची आणखीन एक कलाकार Bollywood मध्ये पदार्पण करत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोची लॉली म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेराव Bollywood मध्ये पदार्पण करणार आहे.

Suraj Chavan : बिग बॉस विजेता सुरज चव्हाण आता बाबा होणार! डोहाळे पुरवा… सुरजच्या पत्नीचे पार पडले डोहाळे जेवण

नम्रता संभेराव झळकणार ‘या’ आगामी सिनेमात!

‘Dhamaal’ सिक्वेलमध्ये आणखीन एक सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 10 जुलै 2026 रोजी, हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. Dhamaal 4 सिनेमात अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफ्री, संजय मिश्रा, रवी किशन, ईशा गुप्ता, संजिदा शेख, अंजली आनंद हे कलाकार झळकणार आहेत. अशामध्ये खासकरून महाराष्ट्रात या सिनेमा संबंधित आणखीन एक नाव चर्चेत आले आहे.

अभिनेत्री नम्रता संभेराव धमाल 4 या सिनेमाच्या माध्यमातून एका लहान भूमिकेत चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तिच्या भूमिकेचे काही क्षण प्रदर्शित करण्यात आलेल्या धमाल 4 च्या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. अभिनेत्री नम्रता संभेराव सिनेमात भुताचे पात्र साकारत आहे, असे ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या मंचावर धमाल करणारी नम्रता संभेराव ‘धमाल 4’ सिनेमात आणखीन काय धमाल करेल? याचे उत्तर 10 जुलै रोजी सिनेमाघरातच मिळेल.

Pranit More Controversy : ‘मला फक्त एक संधी द्या…’ प्रणितने मागितली माफी! Social Media ID ऍक्टिव्हेट होताच केली ‘ती’ पोस्ट

ट्रेलर प्रदर्शित!

बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी ‘धमाल’चा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला असून, नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये खजिन्याच्या शोधाभोवती फिरणारी भन्नाट कथा, गोंधळ, साहस आणि धमाल कॉमेडीची झलक पाहायला मिळते. Ajay Devgn, Arshad Warsi, Riteish Deshmukh, Jaaved Jaaferi आणि Sanjay Mishra यांची टीम पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय Ravi Kishan, Esha Gupta, Sanjeeda Sheikh आणि Anjali Anand यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक Indra Kumar यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट 10 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Namrata sambheraos debut in bollywood dhamaal 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 07:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.