Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajesh Sharma Health Update : किडा नाही तर ‘या’ कारणामुळे अभिनेत्याची खालावली होती तब्येत!

अभिनेते राजेश शर्मा यांच्या प्रकृतीबाबत पसरलेल्या अफवांवर प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या निर्मिती टीमने स्पष्टीकरण दिले आहे. शूटिंगदरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याचा किंवा कीटक चावल्याचा दावा टीमने फेटाळून लावला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 10, 2026 | 04:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • फौजी सिनेमाच्या टीमने राजेश शर्मा यांच्या संबंधित काही दावांना फेटाळले आहे.
  • तब्येतीविषयी माहिती पडताच सिनेमाच्या टीमने राजेश यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा लाख प्रयत्न केला.
  • सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांनी चिंता व्यक्त केली.
विविध हिंदी सिनेमातून तसेच दाक्षिणात्य सिनेमातून नावारूपास आलेले अभिनेते राजेश शर्मा गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात ऍडमिट होते. त्यांच्या आरोग्यासंबंधित असा दावा करण्यात आला होता की प्रभासचा आगामी सिनेमा ‘फौजी’ च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याला कीटक चावला. त्यानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये बिघाड होण्यास सुरुवात झाली. परिणामी, रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी राजेश यांना Not Out Of Danger घोषित केले होते. अशामध्ये फौजी सिनेमाच्या टीमने राजेश शर्मा यांच्या संबंधित काही दावांना फेटाळले आहे.

Silkayara 41: सिल्कयारा बोगदा बचाव मोहिमेची कथा मोठ्या पडद्यावर; Aamir Khan प्रॉडक्शन्सची ‘सिल्कयारा 41’ची घोषणा

फौजी सिनेमाच्या टीमचे म्हणणे आहे की सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते राजेश शर्मा यांच्या प्रकृतीत कोणताही बिघाड झाला नव्हता. अशी कोणतीही बातमी आमच्या प्रोडक्शनच्या एकाही माणसाच्या कानावर आली नव्हती. मुळात, राजेश आठवड्याभरापूर्वीच आपल्या वाटणीचे शूटिंग पूर्ण करून घराकडे निघाले होते. त्यांच्या तब्येतीविषयी माहिती पडताच सिनेमाच्या टीमने राजेश यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा लाख प्रयत्न केला. परंतु, तिथून काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही.

अशामध्ये राजेश शर्मा यांच्या PA ने सत्यस्थिती समजावून सांगितली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “राजेश यांना मधुमेहामुळे त्रास झाला होता. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. परंतु, त्यांच्या प्रकृतीत आता सुधार झाला असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.”

Simulacra movie: आठवणी बदलल्या तर प्रेम टिकेल का? ‘सिम्युलाक्रा’मधून उलगडणार भविष्यकालीन प्रेमकथा

सिनेक्षेत्रातून व्यक्त करण्यात आली चिंता!

अभिनेते राजेश शर्मा यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याचे माहिती पडताच सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांनी चिंता व्यक्त केली. अक्षय कुमारने खास पोस्ट लिहीत शेअर केले की, “माझ्या मित्राला कीटक चावला आणि त्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. पण शंकराच्या आशीर्वादाने तो लवकर ठीक होईल. मित्रा राजेश! लवकर बरा हो रे… अजून आपल्याला सोबत खूप हसायचं आहे.”

Web Title: Reason behind deterioration of health of bollywood actor rajesh sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 04:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.