Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूषण प्रधान-सायली पाटीलच्या केमिस्ट्रीने खुललं ‘जादू केलीस तू’; ‘स्वप्नसुंदरी’चं नवं गाणं प्रदर्शित

‘स्वप्नसुंदरी’ चित्रपटातील ‘जादू केलीस तू’ हे नवं रोमँटिक गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यात भूषण प्रधान आणि सायली पाटील यांची मोहक केमिस्ट्री विशेष लक्ष वेधून घेत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 24, 2026 | 04:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’ मधील ‘जादू केलीस तू’ हे नवं रोमँटिक गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्यात अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री सायली पाटील यांची ताजी आणि आकर्षक जोडी पाहायला मिळत असून, दोघांमधील सहजसुंदर केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रेमातील निरागस भावना, नव्या नात्याची सुरुवात आणि मनात हळूहळू फुलणाऱ्या भावविश्वाचं नाजूक चित्रण या गाण्यात करण्यात आलं आहे. सुरेल संगीत, भावपूर्ण शब्द आणि मोहक दृश्यरचना यामुळे हे गाणं प्रेमगीतांच्या चाहत्यांसाठी खास ठरत आहे.

Vicky Katrina Son Vihaan: कतरिना-विकीचा मुलगा विहान नक्की कोणासारखा दिसतो? आजोबा श्याम कौशलांनी दिलं ‘हे’ उत्तर

या गाण्याची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्याचे संगीत बुडापेस्टमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आहे. त्यामुळे गाण्याच्या सादरीकरणात आंतरराष्ट्रीय दर्जाची झलक अनुभवायला मिळते. इंडियन आयडॉल विजेता अभिजीत सावंत आणि मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर यांच्या मधुर आवाजामुळे गाण्याला वेगळीच उंची लाभली आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतांना अंकुश बोराडकर यांनी सुरेल संगीताची साथ दिली असून, प्रत्येक ओळ प्रेमाच्या भावनांना अधिक गहिरेपणाने व्यक्त करते.

चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या मते, ‘जादू केलीस तू’ हे केवळ एक प्रेमगीत नसून दोन व्यक्तींमधील भावनिक नात्याचा प्रवास उलगडणारं गाणं आहे. भूषण प्रधान आणि सायली पाटील यांनी या भावना अत्यंत नैसर्गिक पद्धतीने पडद्यावर साकारल्या असून, गाणं पाहताना अनेकांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील खास आठवणी जाग्या होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Nikhil Anushka Wedding : वधू-वराची वारी, मांडवाच्या दारी! अनुष्का सरकटे – निखिल चव्हाणच्या लग्नातला मराठमोळा अंदाज Viral

अभिजीत सावंत आणि आर्या आंबेकर यांनीही या गाण्याविषयी बोलताना ते मनाला स्पर्श करणारे असल्याचे सांगितले. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते जी नकळत आपल्या जगात प्रेमाची जादू निर्माण करते आणि हे गाणं त्याच भावनेचं सुंदर प्रतिबिंब असल्याचं त्यांनी नमूद केलं. गाण्याची सुरावट, शब्दांची सहजता आणि भावनांची खोली यामुळे ते गातानाही वेगळाच आनंद मिळाल्याचे दोन्ही गायकांनी सांगितले.

सतीश महादेव गेजगे निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ हा चित्रपट लग्नसंस्था, नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि योग्य जोडीदाराच्या शोधाभोवती फिरणारी कौटुंबिक कथा मांडणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी सांभाळली असून, दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल हे सहनिर्माते आहेत. येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याआधीच ‘जादू केलीस तू’ या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिक वाढली आहे.

Web Title: Swapnasundari movie new song jadu kelis tu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Bhushan Pradhan

संबंधित बातम्या

रोमान्स, भावना आणि फ्रेश केमिस्ट्री, पहिल्यांदाच एकत्र झळकणार भूषण प्रधान आणि सायली पाटील; ‘स्वप्नसुंदरी’मुळे वाढली उत्सुकता
1

रोमान्स, भावना आणि फ्रेश केमिस्ट्री, पहिल्यांदाच एकत्र झळकणार भूषण प्रधान आणि सायली पाटील; ‘स्वप्नसुंदरी’मुळे वाढली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.