फोटो सौजन्य - Social Media
निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांनी मांडवात दिंडीच्या स्वरूपात एंट्री घेतली आहे. जणू काही लग्नाची वारीच निघाली आहे. अनुष्काने डोक्यावर तुळशीचं रोपटं घेतलं आहे. तर वऱ्हाडींच्या हातात मराठमोळी शान भगवे झेंडे देण्यात आले आहेत. देवाच्या नावाने वधू वरांनी मांडवात एंट्री घेतली आहे. दोघांना शुभार्शिवाद देण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. दोघांपुढे चौरसाकृती जाळी धरण्यात आली आहे. त्यावर अनुष्काच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत.
एंट्री पाहता, दोघांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर दोघांचे कौतुक केले आहे. निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटेच्या लग्नाच्या एंट्रीचे सगळी चाहतेमंडळी भरभरून कौतुक करत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांनी विवाहबंधनात अडकत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दोघांची ओळख मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही काळापूर्वी त्यांनी साखरपुडा करून नात्याची अधिकृत घोषणा केली होती. आता कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या नव्या प्रवासासाठी अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.






