Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भूतम भयम’ : नवा कोरा हॉरर मराठी सिनेमा! खरंच हॉरर कॉमेडी विश्वातला गेमचेंजर? ‘या’ तारखेला मिळणार उत्तर

चित्रपटाच्या पोस्टरमध्येच थरार आणि विनोदाचा भन्नाट संगम पाहायला मिळत आहे. “दोस्त दोस्ती, यार यारी, एकाला सात हे सबपे भारी! गल्लीत चर्चा, शहरात heat…” अशा हटके कॅप्शनमुळे सोशल मीडियावर सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 29, 2026 | 08:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमा विनोदानेही परिपूर्ण असणार असल्याचे स्वतः सिनेमाच्या पोस्टरमध्ये दिसत आहे.
  • Zee Studios आणि Kyra Kumar Kreations यांच्या प्रस्तुतीखाली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार
  • ‘भूतम भयम’ हा सिनेमा येत्या २४ जुलैपासून राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार
सध्या मराठी सिनेविश्वात घबाडकुंड, तुंबाडची मंजुळा तसेच इतर थरारक सिनेमांनी इंडस्ट्रीतले वातावरण थोडे हॉरर केले आहे. याच वातावरणात आणखीन एक भर म्हणून नवा कोरा मराठी सिनेमाची एंट्री झाली आहे. सिनेमामध्ये काही असे स्टार्स झळकणार आहेत, ज्यांचा TV शी फार काही संबंध नाही तरी त्यांचे प्रचंड चाहतेमंडळी राज्यभरात आहेत तसेच राज्याबाहेरही पसरले आहेत. सिनेमा फक्त हॉरर गोष्टींचा थरार देणार नसून सिनेमा विनोदानेही परिपूर्ण असणार असल्याचे स्वतः सिनेमाच्या पोस्टरमध्ये दिसत आहे.

Mulshi Pattern 2 : पुन्हा ती क्रूरता रंगणार! ‘मुळशी पॅटर्न 2’ चे दिले संकेत, दिग्दर्शक प्रवीण तरडे अखेर बोललाच

काल या सिनेमाची चाहूल देण्यात आली होती. त्या पोस्टमधून मराठी सिनेरसिकांना चित्रपटात कोण झळकणार असल्याची चाहूल तर नक्कीच लागली असेल. सिनेमात प्रसिद्ध रीलस्टार तसेच हल्लीच बिग बॉस मराठीमध्ये झळकलेले करण सोनावणे तसेच नील सालकर ( Just Neel Things ) आणि सिद्धांत सरफरेही तिगडी झळकणार आहे. त्याचबरोबर सिनेमात सौरभ घाडगे, शुभम जाधव तसेच पुष्कराज चिरपुटकर आणि अनेक प्रसिद्ध मराठी कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे सिनेमात मज्जा तर भरभरून असेल याची खात्री पटते.

‘या’ तारखेला प्रदर्शित होणार सिनेमा!

मराठी प्रेक्षकांसाठी आणखी एक भन्नाट Horror Comedy सिनेमा सज्ज झाला असून अखेर चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ‘भूतम भयम’ असे या सिनेमाचे नाव असून नुकतेच त्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. पोस्टरसोबत दिलेल्या भन्नाट कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, “दोस्त दोस्ती, यार यारी, एकाला सात हे सबपे भारी! गल्लीत चर्चा, शहरात heat… २४ जुलैला बसणार beat! तयार रहा पब्लिक, राडा होणार आहे…” यासोबतच Zee Studios आणि Kyra Kumar Kreations यांच्या प्रस्तुतीखाली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

The Pyramid Scheme Trailer : घरबसल्या लाखो कमाई की धोकादायक स्कॅम? द पिरॅमिड स्कीमच्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता


“हॉरर कॉमेडी विश्वातला गेमचेंजर” अशी टॅगलाईन असलेल्या ‘भूतम भयम’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरमध्ये रहस्य, विनोद आणि थरार यांचा हटके संगम पाहायला मिळत असून सोशल मीडियावर सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि तरुण कलाकारांचा तडका या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे युवा प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयी वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे.
‘भूतम भयम’ हा सिनेमा येत्या २४ जुलैपासून राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून Horror Comedy चाहत्यांसाठी ही एक भन्नाट मेजवानी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: When will the new movie bhootam bhayam release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • latest movies

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.