फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणाला दिग्दर्शक प्रवीण तरडे?
एका चर्चेदरम्यान, दिग्दर्शक प्रवीण तरडेने त्याच्या आगामी सिनेमाविषयी खुलासा केला आहे. जेव्हा मुलाखतदार ‘मुळशी पॅटर्न 2’ सिनेमाविषयी विचारते, तेव्हा प्रवीण तरडे त्याविषयी सपष्टच खुलासा करतो. प्रवीण म्हणतो की, “‘मुळशी पॅटर्न 2’ हा सिनेमा आपल्या घराचं स्वप्न इतकं महागलं का आहे? याचं उत्तर देणारं आहे.” एकंदरीत, तो चित्रपटाचं नावही जाहीर करतो. प्रवीण म्हणतो की “या चित्रपटाचं नाव असेल, ‘मुळशी पॅटर्न 2 : गोष्ट आपल्या घरातल्या भितींतल्या वाळूची'”.
नाव ऐकून त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी ते मुळशी पॅटर्न 2 सिनेमासाठी आतुर असल्याचे सांगितले आहे. एकंदरीत, नावावरून असा अंदाज लावता येऊ शकतो की, “सिनेमा वाळू माफिआवर आधारित आहे.” वाळू क्षेत्रात वाढणारे गुन्हे आणि तस्करी आणि त्यामुळे वाळूच्या किमतीत होणारी वाढ, परिणामी घरांची वाढलेली किंमत, या सगळ्यांचा थरार या सिनेमात दाखवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काय म्हणतंय ‘Deool Band 2’?
प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळबंद 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आठ दिवसांत तब्बल 32 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रभर अनेक शो हाऊसफुल होत आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी, भावनिक कथा आणि प्रवीण तरडे यांच्या अभिनयामुळे सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
याच चर्चेदरम्यान प्रवीण तरडे यांनी ‘Mulshi Pattern 2’ विषयी संकेत दिल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Mulshi Pattern’ हा मराठीतील सर्वात प्रभावी क्राइम ड्रामांपैकी एक मानला जातो. त्यामुळे आता दुसऱ्या भागाची शक्यता व्यक्त होत असून मराठी सिनेसृष्टीत नव्या चर्चांना उधाण आले आहे.






