
फोटो सौजन्य - Social Media
नक्की काय आहे ‘पद्मिनी’?
पद्मिनी एक दंतकथा आहे, जी जगासमोर अभिनयाच्या तसेच विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणण्याचे काम अपूर्वा नेमळेकर करत आहे. 11 elevanmedia च्या साहाय्याने, Padmini या दंतकथेला चाहत्यांसमोर मांडण्यात येत आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी अपूर्वाने तिच्या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून या AI आधारित सिरीजचा पोस्टर लाँच करत, तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल तिच्या चाहत्यांना स्पष्टता दिली होती. दरम्यान, या पोस्टरच्या पोस्टखाली कॅप्शनमध्ये “ती येते… जेव्हा सगळे झोपतात.” असे आकर्षक टायटल देण्यात आले होते. तसेच दुसऱ्या पोस्टर Release मध्ये कॅप्शन म्हणून “त्या रात्रीनंतर सगळंच बदललं… गावात आता रात्री कुणीही बाहेर पडत नाही.” आणि “पद्मिनी… ती काहीच विसरलेली नाही!” असे काहीसे टायटल दिसून आले. एकंदरीत, या दोन्ही कॅप्शनमधून लागलेली हिंट म्हणजे “पद्मिनी, एक Horror AI Micro Drama Series आहे. पद्मिनी या स्त्रीवर अन्याय झाला आणि तेव्हापासून सूडाच्या हेतूने ती प्रत्येक रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा त्या परिसरात संचार करते.
कधी पाहता येणार ‘पद्मिनी’?
मालिकेची निर्माती, दिग्दर्शक तसेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नवा पोस्टर लाँच केला असून, त्यामध्ये या Drama Series ची रिलीज डेट समोर आली आहे. अपूर्वाच्या चाहत्यांना ही सिरीज ९ मे २०२६ पासून पाहता येणार आहे. पोस्टखाली कॅप्शनमध्ये माहिती देत अपूर्वाने नमूद केले आहे की, “जिथे अन्याय गाडला जातो… तिथे काही आठवणी मरत नाहीत. या ९ मे २०२६ पासून… जागी होणार एक दंतकथा. पद्मिनी! ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली, एक सिनेमॅटिक AI मायक्रो ड्रामा मालिका. ‘भीती. शांतता. सूड. न्याय.’ एका आख्यायिकेची सुरुवात…”
कुठे येणार पाहता?
ही मालिका Reel Formate मध्ये लाँच करण्यात येणार आहे. चाहत्यांना मालिका Facebook किंवा Instagram वर पाहता येईल.