Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीन पिढ्या… तीन वेगळे दृष्टिकोन, हर्षदा खानविलकरांसह ‘या’ नव्या नाटकात झळकणार ‘हे’ कलाकार; पाहा प्रोमो

तीन पिढ्यांच्या विचारांचा आणि जीवनशैलीतील फरकांचा वेध घेणारं ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नवं मराठी नाटक येत्या ९ मे रोजी रंगमंचावर दाखल होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 22, 2026 | 10:43 AM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

तीन पिढ्या… तीन वेगळे दृष्टिकोन … आणि एक्सप्रेशनच्या भन्नाट स्टाईल्स! सोशल मिडियावर प्रदर्शित झालेल्या ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नव्या नाटकाच्या व्हिडिओने सध्या प्रेक्षकांचे चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे.

या नाटकात आजी-आजोबा, आई-वडील आणि तरुण पिढी अशा तीन वेगवेगळ्या पिढ्यांचे दृष्टिकोन, त्यांच्या भावना आणि त्यांच्यातील संवाद यांना विनोदी आणि हलक्याफुलक्या शैलीत सादर करण्यात आलं आहे. बदलत्या काळानुसार नात्यांमध्ये होणारे बदल, पिढ्यांमधील मतभेद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंमती-जमती यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या नाटकातून केला जाणार आहे.

या व्हिडिओमध्ये १९७०, १९९० आणि आजचे जेन झी या तिन्ही पिढ्या अगदी वेगळ्या अंदाजात स्वतःला व्यक्त करताना दिसत आहेत. कुठे साधेपणा, कुठे सटल इशारे, तर कुठे थेट डिजिटल मदत. प्रत्येक पिढीची स्वतःची वेगळी वाईब यात दिसतेय.

‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नवंकोरं मराठी नाटक येत्या ९ मे रोजी रंगभूमीवर दाखल होणार असून, एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या जगण्यातील, विचारांतील आणि नात्यांतील मजेशीर प्रवास यानिमित्ताने उलगडणार आहे. दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या व्हिडीओने नाटकाबद्दलती उत्सुकता वाढवली आहे.

हे कलाकार नाटकात झळकणार 

प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ची निर्मिती सोनल प्रोडक्शन्सची आहे. तर अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लेखक अमोल पाटील यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाचे नंदू कदम निर्माते आहेत.

मालिकेत गाजलेल्या जोडीने खऱ्या आयुष्यातही जोडली गाठ! निखिल चव्हाण झाला अनुष्का सरकटेच्या आयुष्यातला खरा कारभारी

एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांवर भाष्य करणारं हे नाटक कौटुंबिक असून हलक्याफुलक्या ढंगात खूप सुंदर विचार मांडणार आहे. हसत-खेळत नाट्यरसिकांना विचार करायला लावणारा हा अनुभव नक्कीच वेगळा ठरेल. एकूणच, पिढ्या बदलल्या तर स्टाईल बदलते… आणि हाच फरक ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ मध्ये मजेशीर पद्धतीने रंगणार आहे.

अबब…! ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ चित्रपटासाठी विशेष ट्रेनिंग! Salman चं Transformation पाहून तरुणी झाले घायाळ

Web Title: A crazy confluence of three generations aamchya pidhichi goshtach vegal hits the stage from may 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • Marathi Entertainment News
  • Priya Bapat
  • Umesh Kamat

संबंधित बातम्या

मनोरंजनाची फुल ऑन मेजवानी, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’चा शतकी टप्पा
1

मनोरंजनाची फुल ऑन मेजवानी, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’चा शतकी टप्पा

हर्षदा खानविलकर–सुनील बर्वे यांची इच्छा पूर्ण; प्रिया बापट–उमेश कामतच्या नाटकात धमाकेदार एंट्री
2

हर्षदा खानविलकर–सुनील बर्वे यांची इच्छा पूर्ण; प्रिया बापट–उमेश कामतच्या नाटकात धमाकेदार एंट्री

नात्यांचा वास्तववादी आणि भावनिक प्रवास! ZEE5 मराठीवरील लोकप्रिय वेबसीरिज ‘हे काय नवीन?’
3

नात्यांचा वास्तववादी आणि भावनिक प्रवास! ZEE5 मराठीवरील लोकप्रिय वेबसीरिज ‘हे काय नवीन?’

कुमार सोहोनी यांचं १२५वं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला; रंगभूमीवर ‘भुल भुलैय्या’चा अनोखा प्रयोग
4

कुमार सोहोनी यांचं १२५वं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला; रंगभूमीवर ‘भुल भुलैय्या’चा अनोखा प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.