फोटो सौजन्य - Social Media
निखिल चव्हाण आणि अनुष्काच्या साखरपुड्याचे काही Photos सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. मुळात, गुपचूप उरकल्या गेलेल्या या आनंदसोहळ्याचा खुलासा राजकीय क्षेत्रातून झाल्याचे दिसत आहे. राजकीय नेते विनोद पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर या सोहळ्याचे क्षण शेअर केले. तसेच पोस्टखाली कॅप्शन दिले की, “आमची भाची अनुष्का सरकटेचा साखरपुडा लोकप्रिय मराठी अभिनेता निखिल चव्हाण याच्यासोबत पार पडला. झी मराठीवरील ‘कारभारी लयभारी’ मालिकेत ते एकत्र झळकले होते. हा सोहळा खास आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आले. या जोडीला खूप प्रेम, आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!”
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
A post shared by Viinod Shoba Naryan patil (@vinodpatil.official)
मालिकेतही झळकली होती ‘ही’ जोडी
अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत झळकले होते. या मालिकेत गाजलेली जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र येत असल्याने दोघांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. दोघांच्या लग्नसोहळ्यासाठी अनेक जण उत्साही आहेत. साखरपुड्यात अनुष्काने लाल-गुलाबी साडी परिधान केली आहे तर निखिल चव्हाणने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे.






