
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी ६ चा गेम आता दिवसेंदिवस रंजक ठरत आहे. दर वीकेंडला घरातून कोण बाहेर पडणार आणि कोणाचा प्रवास थांबणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच बिग बॉसच्या घरात या आठवड्यात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. घरातील स्पर्धकांनी खुप उत्साहात सण साजरा केला पण आता एक सदस्य घराबाहेर जाणार आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. दहाव्या आठवड्यात एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव समोर आले आहे.
दहाव्या आठवड्यात बेघर होण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट आहेत. संस्कृती साळुंके, सागर कारंडे, रेवा कौरासे, विशाल कोटियन, प्रभू शेळके, राकेश बापट आणि दिपाली सय्यद या सदस्यांचा यात समावेश होता. यापैकी सहा जण टास्कमध्ये नॉमिनेट झाले होते.
या आठवड्यात संकेत पाठक घरातला कॅप्टन असल्यामुळे त्याला विशेष पॉवर मिळाली होती. या पॉवरचा वापर करून संकेत ने दिपाली ला थेट नॉमिनेट केलं होते. नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार वाईल्ड कार्ड म्हणून घरात एन्ट्री घेतलेली संस्कृती साळुंके घराबाहेर पडली आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेशने जाहीर केल्यावर दहाव्या आठवड्यात नेमकं कोण घराबाहेर गेलंय याचा उलगडा होईल. संस्कृती खरंच एलिमिनेट असेल तर तिचा महिन्याभराच्या आत बिग बॉसच्या घरातील प्रवास संपलेला आहे.
The 50 Winner: ‘द ५०’ चा विजेता कोण ठरणार? महाअंतिम सोहळा आज; कधी आणि कुठे पाहायचा जाणून घ्या
संस्कृतीचा या आठवड्यात अनेकांशीवाद झाला होता. अनुश्री आणि प्रभू या दोघांशी ती भांडली होती. अनुश्रीने या वादादरम्यान तू यावेळी घरा बाहेर जाणारं असं ठामपणे तिला सांगितले होते. सध्या सोशल मीडियावर संस्कृतीच्या नावाची चर्चा रंगली आहे.
याशिवाय आज भाऊच्या धक्क्यावक काय घडणार आणि रितेश कोणा कोणाची शाळा घेणार आहे. आणि जेवण फेकून दिल्यामुळे रितेश राखीला काय शिक्षा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.