Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट

Mugdha Godbole: अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोलेंनी मुलगी ऋचा रानडेच्या २०व्या वाढदिवसानिमित्त खास फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली. “माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे तू,” असं त्या म्हणाल्या.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 17, 2026 | 01:50 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Mugdha Godbole:मराठी अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले रानडे यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची नेहमीच चर्चा होत असते. अभिनयासोबतच लेखन क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्ता आणि लेखनशैलीचीही अनेकदा प्रशंसा केली जाते. त्यामुळे त्यांना ‘ब्युटी विथ ब्रेन’ म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.विविध मालिका, सिनेमांत काम करीत मनोरंजन क्षेत्रात त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्या पॉडकास्टच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.

वाढदिवशी मुग्धा गोडबोलेंची भावुक पोस्ट

नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे त्या चर्चत आल्या आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीचे फोटो पोस्ट करत लेकीबद्दल लिहिले आहे.मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास फोटो शेअर केले आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टसोबत त्यांनी ऋचा लहान असतानाचे आणि आताचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. मुलीच्या वाढदिवसानिमित्त मुग्धा भावुक झाल्याचं त्यांच्या पोस्टमधून स्पष्ट दिसत आहे.

“आज मी तो नियम मोडण्याची स्वतःला परवानगी दिली”

मुग्धा यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, ऋचाला तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणं फारसं आवडत नाही. मात्र, तिच्या २०व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा नियम मोडला.

त्या लिहितात, “मी जेव्हा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, ते तिला आवडत नाही. पण आज तो नियम मोडण्याची मी स्वतःला परवानगी दिली. आज मी थोडी भावूकही झाली आहे.”

मुलगी २० वर्षांची झाल्याचा आनंद व्यक्त करत मुग्धा यांनी ऋचासाठी खास संदेशही लिहिला आहे.

“माझी मुलगी आज २० वर्षांची झाली आहे”

मुग्धा लिहितात, “माझी मुलगी आज २० वर्षांची झाली आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो, इतकंच मला सांगायचं आहे.”

तसंच आयुष्यात कोणत्या प्रसंगी कसं वागावं, याबद्दलही त्यांनी लेकीला मोलाचा सल्ला दिला. “जिथे नम्रपणा गरजेचा आहे, तिथे नम्र राहा. जिथे खंबीर होण्याची गरज आहे, तिथे खंबीर हो. गरज असेल तेव्हा स्वतःचं संरक्षण कर, शक्य असेल तेव्हा इतरांची काळजी घे,” असं त्यांनी लिहिलं.

 

‘तुझ्या आयुष्यातील माणसं विचारपूर्वक निवड’

मुलीला आयुष्यातील नाती आणि माणसं जपण्याचा सल्ला देताना मुग्धा म्हणाल्या, “तुझ्या आयुष्यातील माणसं विचारपूर्वक निवड. प्राण्यांशी नेहमी दयाळूपणे वाग.”

यानंतर त्यांनी आपल्या नेहमीच्या मिश्कील अंदाजात ऋचाला उद्देशून लिहिलं, “प्लीज, आज सकाळी आपला फोटो न काढण्याचा नियम मी मोडला म्हणून दिवसभर माझ्यावर रागावू नकोस.”

“माझ्या आयुष्यात घडलेली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे तू”

पोस्टच्या शेवटी मुग्धा यांनी लेकीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत लिहिलं, “माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर घडलेली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे तू आहेस, हे लक्षात ठेव. २०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शब्दांत व्यक्त करता येईल त्यापेक्षाही कितीतरी जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. मम्मा आणि बाबा कायम तुझ्यासाठी सुरक्षित ठिकाण आहेत.”

रंगभूमीवर उलगडणार एका गावाची हृदयस्पर्शी कथा! ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’मध्ये प्रेम, कर्तव्य आणि माणुसकीचा अनोखा संगम

मुग्धा यांच्या या भावुक पोस्टवर ऋचानेही कमेंट करत “लव्ह यू मम्मा” असं लिहिलं आहे.

मुग्धा यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये ऋचा लहान असतानाचे काही गोड क्षण, तसेच तिचे आताचे फोटो पाहायला मिळत आहेत. या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कमेंट करत ऋचाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आई-मुलीच्या या खास नात्याची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा होत आहे.

Ananya Raj Death: कोण होती अनन्या राज? १५ जुलैला निधन; कुटुंबाने महिनाभर का लपवून ठेवली निधनाची बातमी? मृत्यूचं कारणही सांगितलं

Web Title: Mugdha godbole daughter richa ranade 20th birthday emotional post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
2

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
3

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.