Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanyogita Bhave Cancer Journey: ‘डाव्या ब्रेस्टमध्ये गाठी..’; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीने सांगितला आजारपणातील कठीण काळ

Sanyogita Bhave Cancer Journey ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम संयोगिता भावेंनी ब्रेस्ट कॅन्सरच्या कठीण प्रवासाबद्दल खुलासा केला. ऑपरेशननंतर इन्फेक्शन, ६ केमोथेरपी आणि आईला गमावल्याचा भावनिक अनुभव सांगितला.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 13, 2026 | 03:42 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sanyogita Bhave Cancer Journey: मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री संयोगिता भावे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमुळे त्या घराघरांत पोहोचल्या. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक असा कठीण काळ आला होता, ज्यामध्ये त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संयोगिता यांनी आपल्या कॅन्सर जर्नीबद्दल अनेक धक्कादायक आणि भावनिक खुलासे केले आहेत.

‘सोनचाफा प्रोडक्शन’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आईला झालेला कॅन्सर, स्वतःच्या आजाराचं निदान आणि उपचारांदरम्यान आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं. त्यांच्या या अनुभवातून आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी लागणारं मानसिक बळ दिसून येतं.

आईला ब्रेस्ट कॅन्सर, त्यानंतर लिम्फोमा; गमावली आईची साथ

संयोगिता भावे यांनी सांगितलं की, त्यांच्या आईला आधी ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्यानंतर त्यांना लिम्फोमाचंही निदान झालं. मात्र, दुर्दैवाने आईला या आजारातून वाचवता आलं नाही. आई त्यांच्यासाठी सर्वस्व होती. त्यामुळे आईला गमावण्याचा धक्का त्यांच्यासाठी अत्यंत मोठा होता.

त्या म्हणाल्या, “माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर होता. त्यानंतर तिला लिम्फोमा झाला. दुर्दैवाने तिला या सगळ्या आजारातून वाचवता आलं नाही. आई माझ्यासाठी सर्व काही होती. तिचं असं मला सोडून जाणं मला सहनच होत नव्हतं.”

डाव्या ब्रेस्टमध्ये जाणवल्या १६ छोट्या गाठी

आईला ब्रेस्ट कॅन्सर झाल्यामुळे डॉक्टरांनी संयोगिता यांनाही नियमित तपासण्या करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्या वेळोवेळी तपासण्या करत होत्या. मार्च २०१८ मध्ये त्यांना एक छोटीशी गाठ जाणवली होती. त्यावेळी त्यांनी फाइन नीडल टेस्ट करून घेतली. मात्र, ती गाठ कॅन्सरची नसल्याचं स्पष्ट झालं.

पुढे जानेवारी-फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्या डाव्या ब्रेस्टमध्ये अनेक गाठी जाणवू लागल्या. नेमकं काय होत आहे, हे त्यांना समजत नव्हतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मॅमोग्राम केला. या तपासणीत ब्रेस्टमध्ये क्लस्टर असल्याचं समोर आलं. त्यामध्ये तब्बल १६ छोट्या नोड्स होत्या. त्यानंतर करण्यात आलेली फाइन नीडल टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं.

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी

कॅन्सरचं निदान होताच हादरल्या; लगेच ऑपरेशन करण्याचा निर्णय

कॅन्सर असल्याचं समजताच संयोगिता यांना मोठा मानसिक धक्का बसला. पुढे काय होणार, उपचार कसे असणार, कामाचं काय होणार आणि उपचारांचे साइड इफेक्ट्स कसे असतील, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले होते. यानंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांचाही सल्ला घेतला. पेट स्कॅन केल्यानंतर कॅन्सर शरीरात इतरत्र पसरलेला नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

ऑपरेशनच्या वेळी करत होत्या श्रीरामाचा जप; नंतर झालं इन्फेक्शन

ऑपरेशनच्या काळातील अनुभव सांगताना संयोगिता भावे यांनी आणखी एक प्रसंग शेअर केला. त्या म्हणाल्या की, रुग्णालयात त्या मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री असल्याचं अनेकांना समजलं होतं. अशा कठीण परिस्थितीतही काही लोक त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी येत होते. मात्र, त्या वेळी त्यांची मानसिक अवस्था वेगळीच होती.

ऑपरेशनसाठी भूल देण्यात आली, तेव्हा त्यांनी श्रीरामाचा जप सुरू केला होता. ऑपरेशन कधी झालं, हेही त्यांना कळलं नाही. शुद्धीवर येत असताना त्या वारंवार ‘मी बरी आहे, तुम्ही कसे आहात?’ असं म्हणत होत्या. मात्र, ऑपरेशननंतर त्यांना इन्फेक्शन झालं. त्यामुळे उपचारांमध्ये आणखी २० दिवस गेले.

२१ दिवसांच्या अंतराने घेतल्या ६ केमोथेरपी

ऑपरेशन आणि इन्फेक्शननंतर संयोगिता यांच्या केमोथेरपीला सुरुवात झाली. त्यांना २१ दिवसांच्या अंतराने एक अशा एकूण सहा केमोथेरपी घ्याव्या लागल्या. पहिल्या केमोनंतर डॉक्टरांनी त्यांना विशेष डाएट पाळण्याचा सल्ला दिला. रोज चार अंडी आणि ड्रायफ्रुट्स खाण्यास सांगण्यात आलं होतं. तसेच कच्चे पदार्थ खाणं टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

विशेष म्हणजे, संयोगिता या शाकाहारी होत्या. त्यामुळे रोज चार अंडी खाणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. मात्र, केमोथेरपीदरम्यान शरीरातील प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना हा आहार घेण्यास सांगितलं होतं.

या संपूर्ण उपचारांच्या काळात डॉक्टर आणि नर्सेस यांनी त्यांची विशेष काळजी घेतली. डॉक्टर त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठीही येत असत. सुरुवातीला त्या अभिनेत्री असल्याचं कोणालाही माहीत नव्हतं. मात्र, नंतर त्यांची ओळख समजल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली.

संयोगिता भावे यांनी सांगितलेला हा प्रवास केवळ आजाराशी लढण्याचा नसून, मानसिक खंबीरपणा आणि कठीण परिस्थितीतही सकारात्मक राहण्याचा अनुभव देणारा आहे. Anil Kapoor on Shatrughan Sinha: अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत

Web Title: Sanyogita bhave cancer journey 16 lumps operation chemotherapy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Breast Cancer
  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

Avengers Endgame Encore OTT Release: ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ ओटीटीवर रिलीज, जिओहॉटस्टारवर कुठे आणि कधी पाहाल?
1

Avengers Endgame Encore OTT Release: ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम एन्कोर’ ओटीटीवर रिलीज, जिओहॉटस्टारवर कुठे आणि कधी पाहाल?

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी
2

Ayushman Khurrana: पंजाबी कुटुंबात वाढलेल्या आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच अनुभवली छठ पूजा; सांगितल्या खास आठवणी

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत
3

Anil Kapoor on Shatrughan Sinha:अनेक दशकांची मैत्री अन् शेजारीही! शत्रुघ्न सिन्हांबद्दल अनिल कपूर यांचं वक्तव्य चर्चेत

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची ८ दिवसांत १००० कोटींची कमाई, रणबीर कपूरच्या नावावर नवा विक्रम
4

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची ८ दिवसांत १००० कोटींची कमाई, रणबीर कपूरच्या नावावर नवा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.