Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलाकारांचा ‘उन्हाळा सामना’! मेघना ताईंकडून सिपर्स तर स्पॉट दादांकडून आठवण ‘सनई चौघडे’च्या सेटवर जय्यत तयारी

सध्या सगळीकडे ऊन वाढलं आहे आणि उन्हाळ्यात सगळ्यात जास्त डिहायड्रेशनचा त्रास होतो. अशावेळी उन्हात जास्त काळ काम करणाऱ्या कलाकारांनी शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातही काळजी घेतील आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 04, 2026 | 10:55 AM
सनई चौघडेच्या सेटवर उन्हाळ्यात कलाकार घेत आहेत काळजी

सनई चौघडेच्या सेटवर उन्हाळ्यात कलाकार घेत आहेत काळजी

Follow Us
Close
Follow Us:
  • सनई चौघडे सेटच्या मालिकेवर उन्हाळ्यात कशी घेतली काळजी 
  • झी मराठीच्या कलाकारांची खास काळजी 
  • कलाकारांनी घेतली काळजी 
सध्या सगळीकडे उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. घामाच्या धारा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण व्हायला होत असतानाच, आपले लाडके कलाकार मात्र शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातही स्वतःची खास काळजी घेत आहेत. ‘सनई चौघडे’ या मालिकेच्या सेटवर सध्या उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

अभिनेत्री चिन्मयी साळवी म्हणजेच शर्वरी हिने सेटवरचे वातावरण आणि ती स्वतः घेत असलेली काळजी याबद्दल खूप छान माहिती दिली आहे. चिन्मयी म्हणते “सध्या ‘सनई चौघडे‘च्या सेटवर आम्ही उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी खूप जागरूक आहोत, कारण शूट कधी कधी आऊटडोअर असतं, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

‘सनई चौघडे’ टीमचे विश्वविक्रमी कार्य! स्वामींच्या नाम-गजराने मिळवले ‘World Records Book of India’मध्ये स्थान

प्रॉडक्शनच घेते काळजी 

सगळ्यात आधी आमचं प्रॉडक्शन खरंच खूप काळजी घेतं. सेटवर कुलर्स, एसी आणि फॅन्सची व्यवस्थित सोय असते, ज्यामुळे वातावरण सुसह्य ठेवण्याचा प्रयत्न असतो. आम्ही स्वतःही नियमितपणे सनस्क्रीन वापरतो आणि हायड्रेशनवर (पाणी पिण्यावर) खूप लक्ष देतो. आम्ही जास्तीत जास्त पाणी पितो. आमचे स्पॉट दादा – ओंकार दादा आणि सतीश दादा – दर तासाला पाण्याची आठवण करून देतात आणि बाटल्या आणून देतात, जेणेकरून आम्ही पाणी प्यायला विसरणार नाही. सेटवर सतत लिंबू सरबत, टॅंग, ऑरेंज ज्यूस अशी रिफ्रेशिंग ड्रिंक्स फिरत असतात. उन्हाळ्यात चहापेक्षा हीच पेय जास्त आवडतात. एक खूप गोड गोष्ट म्हणजे, आमच्या मेघना ताईंनी पहिल्याच दिवशी आम्हा सगळ्यांना ‘सिपर्स’ भेट दिले होते. त्यामुळे प्रत्येकाकडे स्वतःचा सिपर आहे असं चिन्मयीने सांगितलं. 

जेवणातही घेतली जाते काळजी 

आमच्या रोजच्या आहारात दही आणि ताक असतंच, सेटवरच्या जेवणातही ते दिल जात. त्याचबरोबर काकडी, सॅलड, कलिंगड आणि इतर फळं आम्ही घरून सोबत आणतो. अशा थंड आणि हलक्या पदार्थांमुळे शरीर हायड्रेटेड आणि फ्रेश राहायला मदत होते. थोडक्यात सांगायचं तर, या छोट्या-छोट्या सवयींमुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही सेटवर उन्हाळ्याचा सामना अगदी आरामात करत आहोत.” 

 अशा प्रकारे, कडक उन्हातही कामाचा उत्साह कमी होऊ न देता चिन्मयी आणि संपूर्ण टीम स्वतःची काळजी घेत आहे. योग्य आहार, भरपूर पाणी आणि एकमेकांची साथ यामुळे ‘सनई चौघडे’च्या सेटवर उन्हाळ्याचा त्रास कमी आणि कामाची मजाच जास्त दिसतेय.

Sanai Chaughade : ‘सनई चौघडे’ मालिकेची धमाकेदार सुरुवात… चिन्मय मांडलेकरची दमदार एंट्री!

Web Title: Sanai choughade team facing issue of summer how are protecting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

Zee Marathi : सनई चौघडे मालिकेत नवा ट्विस्ट; जयचा माज उतवरण्यासाठी ‘या’ विशेष व्यक्तीची एन्ट्री
1

Zee Marathi : सनई चौघडे मालिकेत नवा ट्विस्ट; जयचा माज उतवरण्यासाठी ‘या’ विशेष व्यक्तीची एन्ट्री

Shubh Shravani Marathi Serial: ‘शुभ श्रावणी’मध्ये मोठा ट्विस्ट! श्रावणी मृत्यूशी झुंजणार; शुभ करणार प्रेमाची कबुली
2

Shubh Shravani Marathi Serial: ‘शुभ श्रावणी’मध्ये मोठा ट्विस्ट! श्रावणी मृत्यूशी झुंजणार; शुभ करणार प्रेमाची कबुली

Tarini Serial : मालिकेत मोठा ट्विस्ट, ‘या’ खलनायिकेने गाशा गुंडाळला , बेलसरे कुटुंबात शितल क्षीरसागरची होणार एन्ट्री
3

Tarini Serial : मालिकेत मोठा ट्विस्ट, ‘या’ खलनायिकेने गाशा गुंडाळला , बेलसरे कुटुंबात शितल क्षीरसागरची होणार एन्ट्री

Zee Marathi : ‘दीपज्योती’ मालिकेत नात्यांचा नवा खेळ! ज्योती करणार स्वराजची ‘वर चाचणी’ तर सुलु आत्या घेणार प्रीतीची ‘वधू परीक्षा’?
4

Zee Marathi : ‘दीपज्योती’ मालिकेत नात्यांचा नवा खेळ! ज्योती करणार स्वराजची ‘वर चाचणी’ तर सुलु आत्या घेणार प्रीतीची ‘वधू परीक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.