Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Umesh Kamat Priya Bapat Anniversary: उमेश -प्रिया यांच्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करत केलं प्रेम व्यक्त

Umesh Kamat Priya Bapat Anniversary: उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दोघांनी खास फोटो शेअर करत एकमेकांसाठी खास पोस्ट लिहिली.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 06, 2026 | 02:08 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Umesh Kamat Priya Bapat Anniversary: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या सुखी संसाराला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ६ ऑक्टोबर रोजी या दोघांनी आपल्या लग्नाचा १५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त उमेश आणि प्रियाने सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा देत काही खास फोटो शेअर केले आहेत.

‘भेट’च्या प्रीमियरमध्ये झाली पहिली भेट

उमेश कामत आणि प्रिया बापट यांची पहिली भेट २००२ मध्ये ‘भेट’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झाली होती. त्यानंतर ‘आभाळमाया’ मालिकेच्या सेटवर दोघांची मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. जवळपास आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर उमेश आणि प्रियाने २०११ मध्ये दसऱ्याच्या दिवशी लग्नगाठ बांधली.

‘१५ वर्षे झाली आणि तरीही आपण एकमेकांचीच निवड करत आहोत’

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उमेश आणि प्रियाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी गेल्या १५ वर्षांच्या सहजीवनातील आठवणी आणि एकमेकांची साथ याबद्दल भावना व्यक्त केल्या.

‘आपल्याला लग्नाच्या १५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! या १५ वर्षांनी आपल्याला खूप काही शिकवलं आहे. आपण प्रगती केली, नवीन गोष्टी शिकलो, काही वेळा अडखळलो, मनसोक्त हसलो आणि काळाच्या प्रत्येक कसोटीवर एकमेकांची साथ घट्ट धरून ठेवली,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

पुढे त्यांनी लिहिलं, ‘असेच एकमेकांचे विश्वासू सोबती, मित्र, सहकारी, सह-निर्माते, प्रवासातील जोडीदार… आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती-पत्नी म्हणून सोबत राहूया. १५ वर्षे झाली आणि तरीही आपण एकमेकांचीच निवड करत आहोत.’

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस

उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी अनेक चित्रपट, नाटकं आणि वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन बॉन्डिंगलाही चाहत्यांची पसंती मिळते. गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांची साथ देणाऱ्या या जोडीवर त्यांच्या चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष

Web Title: Umesh kamat priya bapat anniversary ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Priya Bapat
  • Umesh Kamat
  • Wedding Anniversary

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.