Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Serial: कमळीचा नवा लूक पाहिलात का? दोन वेण्यांची स्टाइल बदलली, आता महाजनांच्या घरी होणार सन्मानाने स्वागत

Zee Marathi serial: झी मराठीच्या ‘कमळी’ मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. कमळीचा नवा लूक पाहायला मिळणार असून मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 06, 2026 | 02:12 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Zee Marathi serial:  झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ सध्या एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. गेल्या दीड वर्षांपासून या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेतील कमळीचा साधा लूक, दोन वेण्या आणि साधे कपडे यांची प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चा असायची. अनेकदा चाहत्यांनी कमळीचा लूक बदलण्याची मागणीही केली होती. अखेर प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होणार असून दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कमळी नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘कमळी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अन्नपूर्णा आजी करणार नातीचा मेकओव्हर

मालिकेत कमळीच्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. भूतकाळातील सत्य समोर आल्यानंतर कमळी ही महाजन कुटुंबाची मोठी नात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अन्नपूर्णा आजी आपल्या लाडक्या नातीचा मेकओव्हर करणार आहेत. नव्या लूकमध्ये कमळीचे मोकळे केस, कपाळावरील चंद्रकोर, नाजूक कानातले आणि सुंदर ड्रेस असा खास अंदाज पाहायला मिळणार आहे. केवळ कमळीच नव्हे, तर तिची आई गौरी हिचाही लूक बदललेला दिसणार आहे. त्यामुळे मायलेकींचा हा नवा अंदाज प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कमळीचा बदललेला लूक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, आता कमळी आणि हृषीच्या लग्नसोहळ्याचीही तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे दोघांच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे. मात्र, या आनंदाच्या क्षणी मालिकेत एक अनपेक्षित ट्विस्ट येणार आहे.

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी

लग्नातून कबड्डीच्या स्पर्धेसाठी जाणार कमळी; हृषी देणार साथ

लग्नसोहळ्यादरम्यान कमळी कबड्डीच्या स्पर्धेसाठी जाण्याचा निर्णय घेते. आपल्या स्वप्नांसाठी ती चक्क भर लग्नातून निघून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र, त्याचवेळी हृषी तिला अडवतो. कमळीला लपून जाण्याची गरज नसल्याचे सांगत तो तिच्या स्वप्नांना पाठिंबा देतो. “स्वत:चं ध्येय पूर्ण करण्यासाठी जाताना अशी लपून का जातेस? जा गड जिंकून ये. मी इथेच तुझी वाट बघेन,” असे म्हणत हृषी तिचा आत्मविश्वास वाढवतो.

हृषीने दिलेल्या या साथीमुळे कमळीला आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढचे पाऊल टाकण्याचे बळ मिळणार आहे. एकीकडे कमळीचा मेकओव्हर आणि महाजनांच्या घरातील नवी ओळख, तर दुसरीकडे तिच्या कबड्डीच्या स्वप्नांना मिळणारी हृषीची साथ, असे अनेक रंजक प्रसंग आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे कमळीच्या आयुष्यात पुढे नेमके काय घडणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

Afra Tafri OTT Release: वडिलांच्या विम्याच्या पैशांमुळे तीन भावांच्या आयुष्यात उडणार गोंधळ; ‘अफरातफरी’ ओटीटीवर येणार

Web Title: Zee marathi serial kamali new look makeover promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Afra Tafri OTT Release: वडिलांच्या विम्याच्या पैशांमुळे तीन भावांच्या आयुष्यात उडणार गोंधळ; ‘अफरातफरी’ ओटीटीवर येणार
1

Afra Tafri OTT Release: वडिलांच्या विम्याच्या पैशांमुळे तीन भावांच्या आयुष्यात उडणार गोंधळ; ‘अफरातफरी’ ओटीटीवर येणार

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी
2

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी

Actress Death: वयाच्या पन्नाशीत घेतला अखेरचा श्वास; हृदयाच्या गंभीर आजारामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन
3

Actress Death: वयाच्या पन्नाशीत घेतला अखेरचा श्वास; हृदयाच्या गंभीर आजारामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन

Aishwarya Rai Abhishek Bachchan: लाल साडीत ऐश्वर्या रायचं सौंदर्य खुललं; अभिषेकला सर्वांसमोर मारली मिठी,पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
4

Aishwarya Rai Abhishek Bachchan: लाल साडीत ऐश्वर्या रायचं सौंदर्य खुललं; अभिषेकला सर्वांसमोर मारली मिठी,पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.