Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi Artists: कुणाला आवडतो घरचा फराळ, तर कुणाला किल्ला बनवण्याची आवड, झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी

Zee Marathi Artists: झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या त्यांच्या बालपणीच्या दिवाळीच्या खास आठवणी. कुणाला आवडतो घरचा गरमागरम फराळ, तर कुणाला मित्रांसोबत किल्ला बनवण्याचा आनंद!

  • By अमृता यादव
Updated On: Nov 06, 2026 | 12:29 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Zee Marathi Artists:  दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई, फराळाची लगबग, नवीन कपड्यांची खरेदी, आकाशकंदील, रांगोळी आणि पणत्यांची रोषणाई डोळ्यांसमोर येते. या सणाला कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र येतात आणि आनंदाचे क्षण साजरे करतात. प्रत्येकाच्या दिवाळीच्या आठवणी मात्र वेगळ्या असतात. लहानपणी आईसोबत केलेली साफसफाई, मित्रांसोबत बनवलेला किल्ला किंवा घरच्या घरी तयार केलेल्या फराळाचा आस्वाद अशा अनेक आठवणी मनात कायमच्या घर करून राहतात. काळानुसार जबाबदाऱ्या वाढल्या आणि कामाचं स्वरूप बदललं, तरी दिवाळीचा उत्साह आजही कायम आहे.

यंदाच्या दिवाळीनिमित्त झी मराठीच्या कलाकारांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी, सध्याची दिवाळी आणि या सणाशी जोडलेल्या खास गोष्टी सांगितल्या आहेत. कोणाला लहानपणी आईला फराळ बनवण्यात मदत करायला आवडायची, तर कोणाला मित्रांसोबत किल्ला बनवण्याची उत्सुकता असायची. जाणून घेऊया कलाकारांच्या दिवाळीच्या खास आठवणी…

राज हंचनाळेच्या आयुष्यात यंदा दोन रूपांत आली लक्ष्मी

‘सनई चौघडे’ मालिकेत जयची भूमिका साकारणारा अभिनेता राज हंचनाळे याच्यासाठी यंदाची दिवाळी खास आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “असं म्हणतात, देव जेव्हा देतो, तेव्हा दोन्ही हातांनी भरभरून देतो. यंदा मला याचा खऱ्या अर्थाने अनुभव येतोय. या वर्षी दिवाळीत माझ्या आयुष्यात लक्ष्मी दोन रूपांत आली आहे. एक माझी छोटी मुलगी आणि दुसरं म्हणजे प्रेक्षकांचं भरभरून मिळणारं प्रेम!”

मालिकेला ‘बेस्ट शो’चा पुरस्कार मिळाल्याचा आनंदही त्याने व्यक्त केला. प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम आणि सोशल मीडियावर येणारे संदेश आपल्यासाठी आनंददायी असल्याचं त्याने सांगितलं. यंदाची दिवाळी तो कुटुंबासोबत आणि आपल्या छोट्या लेकीसोबत पारंपरिक पद्धतीने साजरी करणार आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली खरी ताकद असल्याचंही त्याने आवर्जून नमूद केलं.

विजया बाबरला आजही आठवतात आईसोबत केलेली साफसफाई आणि रंगवलेले दिवे

‘कमळी’ मालिकेत कमळीची भूमिका साकारणारी विजया बाबर सध्या शूटिंगमुळे दिवाळीच्या तयारीत आईला फारशी मदत करू शकत नाही. मात्र, लहानपणीच्या आठवणी तिच्यासाठी खास आहेत. घरात सगळ्यात लहान असल्यामुळे शाळा किंवा कॉलेजमधून घरी आल्यानंतर ती आईसोबत घराची साफसफाई करायची.

विजया सांगते, “मला फराळ बनवायला खूप आवडतं. लहानपणी मी आईला रंगरंगोटी न केलेले साधे दिवे आणायला सांगायचे. मग ते दिवे मी घरी बसून छान रंगवायचे. माझ्या हाताने रंगवलेला दिवा दिवाळीच्या दिवशी घरात लावला जातो, याचा मला खूप आनंद व्हायचा.” आज शूटिंगमुळे वेळ मिळत नसला, तरी या आठवणी तिच्या मनात कायम आहेत.

रोहित परशुरामला आठवते भोरमधील धुक्यातली दिवाळी

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत शंकरची भूमिका साकारणारा रोहित परशुराम सध्या कामानिमित्त मुंबईत राहतो. त्यामुळे पूर्वीसारखा दिवाळीच्या तयारीत सहभागी होता येत नसल्याचं तो सांगतो. मात्र, लहानपणी दिवाळीच्या प्रत्येक कामात त्याचा पुढाकार असायचा. घरातील पंखे साफ करण्यापासून ते आईला फराळ बनवण्यात मदत करण्यापर्यंत तो सगळ्यात पुढे असायचा.

रोहितच्या मते, गरमागरम करंजी खाण्याचा आनंद काही औरच आहे. वडिलांसोबत भोरच्या बाजारात दिवाळीची खरेदी करायला जाणं आणि घरासाठी आपल्या पसंतीचा आकाशकंदील आणणं, या आठवणीही त्याच्यासाठी खास आहेत. शाळेत आकाशकंदील बनवण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याची मजाही त्याने अनुभवली आहे. भोरमधली दिवाळी, त्या दिवसांतील थंडी आणि धुकं आजही त्याला आठवतं.

शिवानी सोनारला फराळापेक्षा किल्ला बनवण्यात अधिक रस

‘तारिणी’ मालिकेतील तारिणी म्हणजेच शिवानी सोनारसाठी दिवाळी हा नेहमीच आवडता सण राहिला आहे. मालिकेच्या सेटवर आणि घरी अशा दोन्ही ठिकाणी दिवाळी साजरी करता येत असल्यामुळे हा आनंद तब्बल १० ते १२ दिवस अनुभवायला मिळतो, असं ती सांगते.

यंदा घराच्या सजावटीची जबाबदारी शिवानीने घेतली असून ती ऑनलाइन खरेदी करत आहे. तिला षटकोनी आकाराचा, एकाच रंगाचा पारंपरिक आकाशकंदील विशेष आवडतो. लहानपणी भावासोबत किल्ला बनवण्याची आठवणही तिच्यासाठी खास आहे. किल्ला बनवण्यासाठी माती गोळा करणं, दगड आणणं, मावळे विकत घेणं किंवा जुन्या मावळ्यांना रंग देणं या सगळ्या गोष्टींची तिला आजही आवड आहे. त्यामुळे फराळापेक्षाही दिवाळीत किल्ला बनवण्यात तिला जास्त रस आहे.

मंदार जाधवला आठवते नवीन कपडे, फटाके आणि आईच्या हातचा फराळ

‘धाकट्या सुनबाई’ मालिकेत वेदांतची भूमिका साकारणारा मंदार जाधव सांगतो की, सध्या दिवाळीच्या तयारीत तो घराच्या साफसफाईत थोडीफार मदत करतो, खरेदी करतो आणि फराळाचा आनंद घेतो. मात्र, लहानपणी नवीन कपडे, फटाके आणि आईने बनवलेला फराळ यांची त्याला विशेष उत्सुकता असायची.

दिवाळीपूर्वी घर सजवणं, आकाशकंदील बनवणं, लाईटिंग करणं आणि वेगवेगळे पदार्थ तयार करणं या सगळ्या गोष्टींची वेगळीच मजा असायची. आता जबाबदाऱ्या वाढल्या असल्या, तरी दिवाळीचा उत्साह आणि आनंद मात्र तसाच असल्याचं मंदार सांगतो. त्याच्यासाठी दिवाळी म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा सुंदर अनुभव आहे.

जुई गोगरीसाठी दिवाळीची खरेदी आणि रांगोळीच्या आठवणी खास

‘सनई चौघडे’ मालिकेत असावरीची भूमिका साकारणारी जुई पुष्पा प्रफुल्ल गोगरी हिच्यासाठी दिवाळी म्हणजे कुटुंबासोबतची धमाल-मस्ती. आई आणि बहिणींसोबत साफसफाई करताना होणारी गंमत, दिवाळीच्या सजावटीसाठी केलेली खरेदी आणि घरी एकत्र बसून फराळ बनवणं या गोष्टी तिला आवडतात.

गेल्या तीन वर्षांपासून दिवाळीच्या सामानाची खरेदी जुई स्वतः करते. स्वतः कमावून घराची जबाबदारी पार पाडताना तिला आनंद वाटतो. तिची बहीण निकितासोबत दरवर्षी रांगोळी काढण्याची आठवणही तिच्यासाठी भावूक करणारी आहे. बहिणीचं लग्न झाल्यानंतर ती हैदराबादला राहते. त्यामुळे रांगोळी काढताना जुईला तिची खूप आठवण येते.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितची होणारी सून कोण? मुलगा आरिनसोबत गर्लफ्रेंडला पाहून सोशल मीडियावर रंगली चर्चा

निखिल दामलेला मित्रांसोबत किल्ला बनवण्याची आठवण

‘कमळी’ मालिकेत ऋषीची भूमिका साकारणारा निखिल दामले याच्यासाठी दिवाळी हा वर्षातील आवडत्या सणांपैकी एक आहे. आई आणि आजीच्या हातचा फराळ हे त्यामागचं मुख्य कारण असल्याचं तो सांगतो. दरवर्षी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन पार्टी करतं, फराळाचा आस्वाद घेतं आणि वेगवेगळे खेळ खेळतं.

लहानपणी मित्रांसोबत किल्ला बनवणं ही त्याची सर्वात सुंदर दिवाळीची आठवण आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करणं आणि किल्ला बनवण्याच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणं याची त्याला विशेष आवड होती. यंदा शूटिंगमुळे तयारीत सहभागी होता येणार नसल्याची खंतही त्याने व्यक्त केली.

Aishwarya Rai Abhishek Bachchan: लाल साडीत ऐश्वर्या रायचं सौंदर्य खुललं; अभिषेकला सर्वांसमोर मारली मिठी,पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

ट्विंकल यादवला आठवते गावाकडची दिवाळी

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी ट्विंकल यादव लहानपणी दिवाळीला गावी जायची. तिथे सगळे एकत्र बसून फराळ बनवायचे आणि ती आवडीने हे सगळं पाहायची. थोडीफार मदतही करायची; मात्र तिचं मुख्य लक्ष फटाके फोडण्याकडे असायचं.

आता दिवाळीच्या खरेदीपासून ते घरासाठी काय हवं, काय नको याच्या चर्चेपर्यंत ती आईसोबत सहभागी होते. पूर्वी केवळ छोटी-मोठी मदत करणारी ट्विंकल आता फराळ बनवण्यातही आवडीने हातभार लावते. अशा प्रकारे झी मराठीच्या कलाकारांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी आणि आजच्या दिवाळीतील बदललेल्या जबाबदाऱ्यांमधून या सणाचा आनंद व्यक्त केला आहे.

Web Title: Zee marathi artists diwali childhood memories ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • entertainment
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Dhanteras Gold Investment Guide : धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी? दागिने, कॉईंन की गोल्ड ETF; गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय उत्तम?
1

Dhanteras Gold Investment Guide : धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी? दागिने, कॉईंन की गोल्ड ETF; गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय उत्तम?

Actress Death: वयाच्या पन्नाशीत घेतला अखेरचा श्वास; हृदयाच्या गंभीर आजारामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन
2

Actress Death: वयाच्या पन्नाशीत घेतला अखेरचा श्वास; हृदयाच्या गंभीर आजारामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन

Diwali Sugar Free Sweets Recipes: मधुमेहींसाठी यंदाची दिवाळी गोड! साखरेशिवाय बनवा स्वादिष्ट मिठाई; पाहा सोप्या रेसिपी
3

Diwali Sugar Free Sweets Recipes: मधुमेहींसाठी यंदाची दिवाळी गोड! साखरेशिवाय बनवा स्वादिष्ट मिठाई; पाहा सोप्या रेसिपी

Aishwarya Rai Abhishek Bachchan: लाल साडीत ऐश्वर्या रायचं सौंदर्य खुललं; अभिषेकला सर्वांसमोर मारली मिठी,पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
4

Aishwarya Rai Abhishek Bachchan: लाल साडीत ऐश्वर्या रायचं सौंदर्य खुललं; अभिषेकला सर्वांसमोर मारली मिठी,पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.