Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी

Marathmola Fashion Show 2026: ठाण्यात ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’चा दिमाखदार सोहळा रंगला. पारंपरिक वेशभूषा, मराठी संस्कृती आणि फॅशनचा सुरेख मिलाफ पाहायला मिळाला.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 08, 2026 | 02:26 PM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Marathmola Fashion Show 2026: महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी मराठमोळा साजशृंगार, पारंपरिक वेशभूषा आणि आत्मविश्वासाची मनमोहक झलक सादर करत ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये रंगत आणली. ठाणे येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात पारंपरिक मराठी संस्कृती, वेशभूषा आणि आधुनिक फॅशन यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळाला.

लहान मुलांपासून महिला आणि पुरुषांपर्यंत विविध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि कलागुणांची छाप उमटवली. या कार्यक्रमाचे आयोजन वैशाली काळे, सागर सकट आणि अभिनंदन गायकवाड यांनी केले होते.

मराठी कलाकारांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढली

‘मराठमोळा फॅशन शो २०२६’ला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारांची उपस्थिती लाभली. अभिनेता सागर कारंडे, रेशम टिपणीस, अनिकेत विश्वासराव, विशाल कोटियन, वीणा जगताप, हेमा शर्मा, चिन्मय उदगीरकर, अभिजीत बिचुकले, हर्षद अतकरी आणि प्रियांका खोलगडे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

नामवंत कलाकारांच्या उपस्थितीमुळे फॅशन शोला ग्लॅमरची विशेष जोड मिळाली. कलाकारांनी स्पर्धकांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.

बालगटात ‘मराठमोळा’चा जल्लोष

४ ते ८ वर्षे वयोगटातील ‘मराठमोळा’ स्पर्धेत बालस्पर्धकांनी आपल्या निरागसपणासोबतच आत्मविश्वास आणि स्टेज प्रेझेन्सने उपस्थितांची मने जिंकली. या गटात शौर्य, सानिका सावळे, अदिरा गाडे आणि सुमन विसपुते यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

सुमन विसपुते यांना ‘बेस्ट पर्सनॅलिटी’ हा विशेष पुरस्कार मिळाला. तर अद्विक ज्युनियर शिवाजी महाराज याला ‘मिस्टर ज्युनियर मराठमोळा’ हा किताब देण्यात आला.

९ ते १४ वर्षे वयोगटातही स्पर्धकांनी आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत परीक्षकांची मने जिंकली. या गटात आराध्या हिने विजेतेपद पटकावले. शैश मोरे प्रथम उपविजेता, तर पृथ्वीराज साळुंके द्वितीय उपविजेता ठरले. धृणा मुलचंदानी हिला ‘बेस्ट स्माईल’, तर काव्या कदम हिला ‘बेस्ट वॉक’ या विशेष पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

Operation Ganga: मोहनलालच्या ‘ऑपरेशन गंगा’त दिसणार लष्करी कारवाईचा थरार; कॉम्बॅट ॲडव्हायझर म्हणून वर्लिन पंवारांची एन्ट्री

‘Mrs.’ विभागात महिलांचा आत्मविश्वास ठरला आकर्षण

‘Mrs.’ विभागात महिलांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेसोबतच आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि स्टेज प्रेझेन्सचे प्रभावी दर्शन घडवले. हिंदवी चव्हाण यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

मोनाली कांबळे प्रथम उपविजेत्या, तर रितू निचानी द्वितीय उपविजेत्या ठरल्या.

‘Miss’ विभागात तरुणाईचा उत्साह

‘Miss’ विभागातही स्पर्धकांनी सौंदर्यासोबतच आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवली. गौरी चव्हाण हिने विजेतेपद पटकावले. मिनल मून प्रथम उपविजेती, तर डॉ. ऐश्वर्या दळवी द्वितीय उपविजेती ठरली.

पुरुष विभागात निखिल जगध विजेता

पुरुष विभागात निखिल जगधने याने आपल्या प्रभावी सादरीकरणातून विजेतेपद पटकावले. पियुष राजपूत प्रथम उपविजेता ठरला. सैफ अली खान आणि यश वायफळकर यांनी द्वितीय उपविजेतेपद मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!

मराठमोळ्या संस्कृतीचा अनोखा जागर

‘मराठमोळा फॅशन शो २०२६’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेतील साजशृंगार, पारंपरिक वेशभूषा आणि मराठीपणाचा अभिमान प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आला. विविध वयोगटातील स्पर्धकांना आपले कौशल्य, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास सादर करण्यासाठी या मंचाने महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिली.

मराठी संस्कृती आणि कलाविश्वाला एकत्र आणणाऱ्या या उपक्रमाला कलाकार, स्पर्धक, फॅशनप्रेमी आणि रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंपरेचा अभिमान जपत आधुनिक फॅशनविश्वाशी मराठमोळ्या संस्कृतीची सांगड घालण्याचा सुंदर प्रयत्न म्हणजे ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Web Title: Marathmola fashion show 2026 marathi celebrities thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

Abhinay Berde Career Break: अभिनय बेर्डेने अचानक का घेतला करिअरमधून ब्रेक? VIDEO शेअर करत सांगितलं खरं कारण
1

Abhinay Berde Career Break: अभिनय बेर्डेने अचानक का घेतला करिअरमधून ब्रेक? VIDEO शेअर करत सांगितलं खरं कारण

Operation Ganga: मोहनलालच्या ‘ऑपरेशन गंगा’त दिसणार लष्करी कारवाईचा थरार; कॉम्बॅट ॲडव्हायझर म्हणून वर्लिन पंवारांची एन्ट्री
2

Operation Ganga: मोहनलालच्या ‘ऑपरेशन गंगा’त दिसणार लष्करी कारवाईचा थरार; कॉम्बॅट ॲडव्हायझर म्हणून वर्लिन पंवारांची एन्ट्री

Bigg Boss 20: आम्रपाली दुबे-माही विजसोबत अरिश्फा खानची जोरदार खडाजंगी; ‘बिग बॉस’च्या घरात नवा वाद!
3

Bigg Boss 20: आम्रपाली दुबे-माही विजसोबत अरिश्फा खानची जोरदार खडाजंगी; ‘बिग बॉस’च्या घरात नवा वाद!

Toxic Ott Release: ‘टॉक्सिक’ची OTT डील अडकली! मेकर्सची 200 कोटींची मागणी, प्लॅटफॉर्मने कमी केली ऑफर
4

Toxic Ott Release: ‘टॉक्सिक’ची OTT डील अडकली! मेकर्सची 200 कोटींची मागणी, प्लॅटफॉर्मने कमी केली ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.