Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naagin Movie: ‘नागिन’ आता टीव्हीवर नाही तर मोठ्या पडद्यावर? नागपंचमीच्या मुहूर्तावर एकता कपूरने दिले संकेत; दाखवली 6 नागिणींची झलक

Naagin Movie: एकता कपूर यांनी नागपंचमीला ‘नागिन’ फ्रँचायझी टीव्हीच्या पुढे नेण्याची घोषणा केली. सहा लोकप्रिय नागिणींची झलक दाखवत त्यांनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 18, 2026 | 03:06 PM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Naagin Movie: टीव्ही क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूर यांच्या सासू-सुनेच्या मालिकांनी छोट्या पडद्यावर मोठं यश मिळवलं आहे. मात्र, टीआरपी आणि लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांच्या ‘नागिन’ फ्रँचायझीने वेगळीच उंची गाठली. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेचे आतापर्यंत सात सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता या लोकप्रिय फ्रँचायझीला छोट्या पडद्याच्या पुढे नेण्याचा निर्णय एकता कपूर यांनी घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

एकता कपूर करणार मोठा धमाका?

नागपंचमीच्या निमित्ताने एकता कपूर यांनी चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे. त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ‘काहीतरी रंजक येणार आहे’ अशी हिंट दिली आहे. यासोबत त्यांनी ‘नागिन’ फ्रँचायझीतील आतापर्यंतच्या प्रमुख अभिनेत्रींची झलक असलेला एक व्हिडीओही शेअर केला.

या व्हिडीओची सुरुवात अभिनेत्री मौनी रॉय हिच्यापासून होते. त्यानंतर गेल्या ११ वर्षांमध्ये ‘नागिन’च्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्रींच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली आहे.

सहा-सात नागिणींची दिसली झलक

‘नागिन’च्या आतापर्यंतच्या सात सीझनमध्ये मौनी रॉयसोबत अदा खान, सुरभी ज्योती, सुरभी चंदना, निया शर्मा, तेजस्वी प्रकाश आणि प्रियंका चाहर चौधरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. एकता कपूर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या अभिनेत्रींची झलक पाहायला मिळते.

व्हिडीओसोबत सांगण्यात आलं आहे की, ‘११ वर्षांपासून ‘नागिन’ने छोट्या पडद्यावर राज्य केलं आहे. आता बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड ही प्रतिष्ठित फ्रँचायझी टीव्हीच्या पुढे नेण्यासाठी सज्ज आहे.’

गर्भवती पत्नीला सोडून मोलकरणीसोबत प्रेमसंबंध? अभिनेत्याविरोधात दुसऱ्या पत्नीची कोर्टात धाव; खासगी आयुष्याची जोरदार चर्चा

‘नागिन’चा सिनेमा येणार की वेब सीरिज?

एकता कपूर यांनी आपल्या पोस्टमधून नेमकं काय येणार आहे, याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे ‘नागिन’ची कथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार का, की या लोकप्रिय फ्रँचायझीवर एखादी वेब सीरिज तयार केली जाणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘नागिन’च्या लोकप्रियतेचा विचार करता, एकता कपूर या फ्रँचायझीला नव्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Jay Jay Swami Samarth: मार्तंडचा डाव यशस्वी होणार की उलटणार? स्वामींविरोधात सुभेदारांचा मोठा निर्णय; ४ दिवसांची मुदत

Web Title: Naagin movie beyond tv ekta kapoor nag panchami 6 naagins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • ekta kapoor
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.