Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pulkit Samrat Health: २.५ किलो वजन घटलं, मलेरियाशी लढतोय पुलकित सम्राट; इन्स्टाग्रामवर शेअर केला भावुक अनुभव

Pulkit Samrat Health: मलेरियाशी झुंज देताना अभिनेता पुलकित सम्राटचं २.५ किलो वजन घटलं असून त्याची बरीच ताकदही कमी झाली आहे. आजारपणाचा अनुभव सांगताना पुलकितने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर केली. मात्र, सकारात्मक राहून पुन्हा फिटनेस मिळवण्याचा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 18, 2026 | 11:10 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Pulkit Samrat Health: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट सध्या मलेरियाशी झुंज देत आहे. आपल्या फिटनेस आणि दमदार शरीरयष्टीसाठी ओळखला जाणारा पुलकित आजारपणामुळे शारीरिकदृष्ट्या कमजोर झाला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टनंतर चाहते चिंतेत असून, त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

मलेरियामुळे २.५ किलो वजन घटलं

पुलकितने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. या पोस्टमधून त्याने मलेरियाचा त्याच्या शरीरावर झालेला परिणाम सांगितला.

कडक फिटनेस रुटीनसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुलकितने सांगितलं की, मलेरियाचा त्याच्या शरीरावर अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर परिणाम झाला आहे. या आजारामुळे त्याचं २.५ किलो वजन कमी झालं असून, त्याची बरीच शक्तीही कमी झाली आहे.

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

‘पुन्हा शरीर घडवू’

शारीरिक कमजोरीचा सामना करत असतानाही पुलकितने सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “मलेरियाचा माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर परिणाम झाला आहे. माझे २.५ किलो वजन आणि बरीच शक्ती कमी झाली आहे. पण मला माझ्या शरीराची चांगली ओळख आहे. आपण हे शरीर यापूर्वीही घडवले आहे आणि पुन्हा घडवू.”

पुलकितच्या या सकारात्मक विचारांनी त्याच्या चाहत्यांचंही मन जिंकलं आहे. आजारपणामुळे फिटनेसवर परिणाम झाला असला तरी पुन्हा पूर्वीची ताकद आणि शरीरयष्टी मिळवण्याचा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला आहे.

Clean Up Company Trailer: तीन मित्रांनी सुरू केली ‘मृतदेह विल्हेवाट’ लावण्याची कंपनी! अमेय वाघच्या ‘क्लीन अप कंपनी’चा ट्रेलर रिलीज

चाहत्यांकडून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना

पुलकितने आपल्या तब्येतीबाबत माहिती दिल्यानंतर चाहते, मित्र आणि हितचिंतक त्याच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर कमेंट्स आणि मेसेजच्या माध्यमातून चाहते त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

सध्या पुलकित आपली गमावलेली ताकद परत मिळवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. लवकरच तो पुन्हा आपल्या नेहमीच्या फिटनेस रुटीनमध्ये परतेल, अशी आशा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.

Zee Marathi Serial: बायकोसाठी समरचं खास सरप्राईज! मॉडर्न लूकमध्ये दिसली स्वानंदी; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा नवा प्रोमो चर्चेत

Web Title: Pulkit samrat health lost 2 5 kg battling malaria emotional instagram update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Actor
  • Bollywood
  • malaria

संबंधित बातम्या

malaria patients in Mumbai : मुंबईत मलेरियाच्या रुग्णांची संख्या 09 हजारांच्या वर, इतक्या टक्क्यांनी वाढले रुग्ण
1

malaria patients in Mumbai : मुंबईत मलेरियाच्या रुग्णांची संख्या 09 हजारांच्या वर, इतक्या टक्क्यांनी वाढले रुग्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.