Malaria Early Symptoms: पावसाळ्यात मलेरियाचा धोका वाढतो, विशेषतः लहान मुलांमध्ये संसर्ग गंभीर ठरू शकतो. त्यामुळे मलेरियाची सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
राज्यात २०२३ ते २०२५ दरम्यान हिवतापाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. यातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे पी. एफ. प्रकाराचे प्रमाण ३९ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत गेल
पी.एफ. मलेरियामध्ये रुग्णाची प्रकृती अचानक खालावते. मेंदूवर परिणाम होऊन 'सेरेब्रल मलेरिया' होण्याचा धोका असतो. यामुळे बेशुद्धावस्था, झटके येणे तसेच किडनी व लिव्हर निकामी होण्यासारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात.
मलेरिया सहसा पावसाळ्याशी जोडला जातो,कारण या काळात साचलेल्या पाण्यात डासांची वाढ होते. मलेरिया फक्त पावसाळ्यातच होतो असा नाही. बांधकामे, पाण्याची गळती किंवाखराब ड्रेनेज यांसारख्या कारणांमुळे वर्षभर साचलेले पाणी आढळू शकते.
मलेरिया आजराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी २५ एप्रिलला जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. गंभीर आजाराबद्दल जागरूक करणे आणि त्याच्या प्रतिबंधासाठी प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आहे.
भायखळा परिसरात मलेरियाच्या वाढत्या प्रकरणांमुळे डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली असून तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.