
फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणते रिचा चड्ढाची पोस्ट?
रिचा चड्ढाने तिच्या X हँडलवर @priyanka2bharti या हॅण्डलवरून शेअर करण्यात आलेली पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये दोन वृद्ध व्यक्ती आंदोलक विद्यार्थ्याशी वाद घालताना दिसत आहेत. वृद्ध व्यक्ती विद्यार्थ्यांच्या विरोधात बोलत आहेत, तसेच सरकारच्या पारड्यात त्यांचे मत असल्याचे स्पष्ट होत आहे. या पोस्टखाली @priyanka2bharti या हॅन्डलने कॅप्शन दिले आहे की “ज्यांची वाट स्मशान पाहत आहे, ते येऊन इथे आम्हाला शिकवत आहेत. स्वतःला धड चालत येत नाहीये आणि सोनम वांगचुक यांना वृद्ध बोलत आहेत. असे पेन्शनवर जगणारे अंधभक्त या देशासाठी एक विष आहेत. या लोकांना युवकांनी चांगलीच क्लास घेतली होती.”
यावर रिचा चड्ढाने पोस्ट करत म्हंटले आहे की, “फक्त वयाने मोठे आहेत म्हणून कोणालाही आपोआप मान देऊ नका. काही जण भक्तीच्या नादात इतके हरवून जातात की त्यांना वास्तवाचं भानच राहत नाही. स्वतः रात्री पाच वेळा बाथरूमला जावं लागतं, पण तरुणांशी पंगा घ्यायची भाषा करतात. फक्त ते तुमच्या आधी जन्माला आले म्हणून त्यांना आदर मिळायलाच हवा, असं नाही. आदर हा वागणुकीने आणि स्वभावाने कमवावा लागतो. अशा परिस्थितीत वाद घालण्यापेक्षा रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्यात, सुरक्षित अंतर ठेवून, वर्तमानपत्रावर थोडंसं अन्न ठेवा आणि पुढे निघून जा. त्यांच्याशी वाद किंवा थेट संपर्क टाळा.”
काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे?
रिचा चड्ढाची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी रिचाचे वृद्ध व्यक्तींना असे म्हणणे योग्य नसल्याचे सांगितले आहे, तसेच तिच्याविरोधात अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी वृद्ध व्यक्तींच्या विचारांविरोधात कमेंट्स केल्या आहेत.