Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Savani Ravindra: राष्ट्रीय पुरस्कारानंतर पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना आणखी मोठा सन्मान; ‘लता मंगेशकर पुरस्कार 2026’ प्रदान

Savani Ravindra Received Lata Mangeshkar Award 2026: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 28, 2026 | 08:53 PM
Savani Ravindra

Savani Ravindra

Follow Us
Follow Us:
  • सावनी रवींद्र यांच्या शिरपेचात मानाचा तुरा
  • ‘भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार 2026’ने गौरव
  • मंगेशकर कुटुंबीयांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या चौथ्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष संगीत कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला.संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सावनी रवींद्र यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते मिळालेला हा सन्मान त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत अभिमानास्पद आणि भावनिक क्षण ठरला.

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

या विशेष सोहळ्याला ज्येष्ठ उद्योगपती प्रतापराव पवार, भावगंधर्व पं.हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, मंगेशकर कुटुंबीय, पद्मश्री पं. सुरेश वाडकर, मा. चंद्रकांतदादा पाटील, मेधा कुलकर्णी, सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्व दिग्गजांच्या उपस्थितीत सावनी रवींद्र यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सावनी रवींद्र म्हणाल्या, “मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते मिळालेला हा ‘भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार’ माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर माझ्या संपूर्ण संगीतप्रवासाला लाभलेला सर्वोत्तम आशीर्वाद आहे. लतादीदींच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार स्वीकारताना शब्द अपुरे पडत आहेत.” यांनी हा सन्मान आपल्या आई-वडिलांना ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ.रविंद्र घांगुर्डे आणि डॉ. वंदना घांगुर्डे, तसेच आपल्या सर्व गुरुजनांना समर्पित केला. “माझ्या आयुष्यात संगीताचे संस्कार रुजवणारे माझे आई-वडील, मार्गदर्शन करणारे माझे गुरुजन आणि माझ्यावर प्रेम करणारे रसिक यांच्या आशीर्वादांशिवाय हा क्षण शक्य झाला नसता,” अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच लतादीदींच्या अमूल्य संगीतवारशाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असून, त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते स्वीकारणे हा आपल्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय आणि भावनिक क्षणांपैकी एक असल्याचेही त्यांनी नमूद केले.संगीतविश्वातील सर्वोच्च प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार प्राप्त होणे म्हणजे प्रत्येक गायक-गायिकेसाठी मोठा गौरव असून, सावनी रवींद्र यांच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

Web Title: Savani ravindra lata mangeshkar award 2026 national award singer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • awarded
  • Lata Mangehskar
  • savaniee ravindra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.