
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Shilpa Shetty Ganesh Chaturthi: आज, १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थीचा उत्सव देशभरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जात आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरोघरी बाप्पांच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली असून, सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष ऐकायला मिळत आहे. विशेषतः मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार दरवर्षी आपल्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना करतात. यंदाही सेलिब्रिटींच्या घरी गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे.
गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या घरी बाप्पांचं स्वागत केलं. पती राज कुंद्रासोबत शिल्पाने गणरायाची मूर्ती घरी आणली.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा बाप्पांना घरी घेऊन येतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा पिस्ता ग्रीन रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. कारमधून बाप्पांची मूर्ती उतरवताना तिने चप्पल काढून ठेवली आणि भक्तिभावाने गणरायाचं स्वागत केलं.
पती राज कुंद्रासोबत शिल्पाने बाप्पांची मूर्ती घरी आणली.
पिस्ता ग्रीन सूटमधील शिल्पाचा साधा आणि भक्तिभावपूर्ण अंदाज लक्ष वेधून घेत आहे.
कारमधून बाप्पांची मूर्ती उतरवताना शिल्पाने चप्पल काढली.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचं घरात स्वागत करण्यात आलं.
बाप्पांच्या आगमनावेळी शिल्पाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळाला.
शिल्पा शेट्टीची बाप्पांवर विशेष श्रद्धा आहे. अभिनेत्री दरवर्षी आपल्या कुटुंबासोबत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करते. मात्र, २०२५ मध्ये कुटुंबातील शोकामुळे शिल्पाच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. घरात शोक असल्याने प्रथेनुसार १३ दिवस पूजा-पाठ केला जात नाही. त्यामुळे मागील वर्षी शिल्पाला बाप्पांचं स्वागत करता आलं नव्हतं.
यंदा मात्र पुन्हा एकदा शिल्पाच्या घरी गणरायाचं आगमन झाल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. शिल्पाच्या बाप्पा स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
शिल्पा शेट्टीसोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकार दरवर्षी आपल्या घरी बाप्पांचं स्वागत करतात. सोनू सूद, अर्पिता खान, आयुष्मान खुराना, कार्तिक आर्यन, श्रद्धा कपूर आणि सोनाली बेंद्रे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारही बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
दरम्यान, शिल्पा शेट्टी काही दिवसांपूर्वी नेपाळमधील काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिरात दर्शनासाठी गेली होती. ऑगस्टच्या सुरुवातीला अभिनेत्रीने या आध्यात्मिक प्रवासाची झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. मंदिरासमोर हात जोडून प्रार्थना करतानाचे तिचे फोटोही चर्चेत आले होते.