( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Shilpa Shetty Dance : कुणाल खेमूची प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित हाय-स्टेक्स अॅक्शन-कॉमेडी ‘VIBE’ची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, अॅक्शन, कॉमेडी, गोंधळ आणि अनपेक्षित ट्विस्टमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. त्यातच चित्रपटातील एनर्जेटिक ‘ऐसी मेरी Vibe’ हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
कुणाल खेमू आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्सने सजलेल्या या गाण्याने रिलीज होताच सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं. सध्या अनेकजण या गाण्याच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. क्रिकेटपटू रोहित शर्मानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही ‘ऐसी मेरी Vibe’च्या फीव्हरमध्ये सामील झाल्या आहेत.
शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या ‘VIBE’मधील ‘ऐसी मेरी Vibe’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. गाण्याच्या तालावर थिरकत त्यांनी या ट्रेंडमध्ये सहभागी होत आपली खास ‘Vibe’ दाखवली आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअर करताना शिल्पा शेट्टी यांनी कुणाल खेमूच्या कामाचं कौतुक केलं. “Bitten by the #VIBE bug” असं म्हणत त्यांनी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचंही सांगितलं. विशेष म्हणजे, त्यांनी प्रीती झिंटाला टॅग करत ‘मी केलं’ असं सांगितलं आणि पुढे जेनेलिया देशमुखलाही हा डान्स करण्याचं चॅलेंज दिलं.
इतकंच नाही तर शिल्पा शेट्टी यांनी वंशिका धीरचं कौतुक करत स्पर्श श्रीवास्तवच्या डान्स मूव्ह्जचंही कौतुक केलं. अखेरीस त्यांनी सैफ अली खानची पत्नी करीना कपूर खानला टॅग करत तिलाही या गाण्यावर थिरकताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
शिल्पा शेट्टी यांच्या या मजेशीर अंदाजामुळे ‘ऐसी मेरी Vibe’ची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. त्यांच्या या डान्स व्हिडीओची सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे.
कुणाल खेमू यांनी ‘VIBE’चं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. कुणाल खेमू आणि चिराग निहलानी यांनी Drongo Filmsच्या बॅनरखाली Amazon MGM Studiosच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात कुणाल खेमूसोबत प्रीती जी. झिंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि पदार्पण करणारी वंशिका धीर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ‘VIBE’ हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.






