Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा; विशेष मुलांसोबत ‘सन मराठी’च्या कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण

Sun Marathi Actors Raksha Bandhan Celebration: ‘सन मराठी’ वाहिनीच्या कलाकारांनी राखीपौर्णिमेनिमित्त परळ येथील नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 27, 2026 | 07:24 PM
Raksha Bandhan Celebration:

Raksha Bandhan Celebration:

Follow Us
Follow Us:
  • निरागस हास्याने खुलली राखीपौर्णिमा
  • सन मराठी’च्या कलाकारांनी साजरा केला प्रेमाचा सण
  • मुलांच्या कलेचे आणि मेहनतीचे मनापासून कौतुक
मनोरंजनाच्या माध्यमातून कायमच प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या ‘सन मराठी’ वाहिनीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. याच भावनेतून राखीपर्णिमेच्या निमित्ताने ‘सन मराठी’च्या कलाकारांनी परळ येथील श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेला भेट दिली. मुलांसोबत वेळ घालवत, गप्पा मारत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत कलाकारांनी हा सण खास केला. यावेळी ‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेतील अनुप्रिया म्हणजेच अभिनेत्री दीप्ती केतकर. ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेतील समीर-अर्पिता म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता अंबर गणपुले, तसेच ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ मालिकेतील वृंदा-मोहन म्हणजेच अभिनेत्री स्वाती भिंगारदिवे आणि अभिनेता संग्राम समेळ उपस्थित होते.

Rashmika-Vijay च्या ‘रणबाली’साठी आणखी प्रतीक्षा; 11 सप्टेंबरला नाही, आता ‘या’ दिवशी होणार रिलीज

या राखीपौर्णीमाचा सर्वात खास क्षण म्हणजे विशेष मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या कलाकारांना प्रेमाने बांधल्या, कलाकारांनी त्यांना भेटवस्तू देत त्यांचा दिवस खास बनवला. या सुंदर क्षणाने कलाकारही भावूक झाले. त्यांनी मुलांच्या कलेचे आणि मेहनतीचे मनापासून कौतुक करत, त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण साजरे केले.

या अनोख्या राखी पौर्णिमेबद्दल अभिनेत्री योगिता चव्हाण भावूक होत म्हणाली की, “आपण आजकाल एका अशा जगात जगतोय, जिथे अनेक गोष्टी खऱ्या असण्यापेक्षा दाखवण्यासाठी केल्या जातात. त्यामुळे मनापासून व्यक्त होणाऱ्या, कोणताही स्वार्थ नसलेल्या आणि अगदी निखळ अशा emotions ची आपल्याला फारशी सवय राहिलेली नाही. या मुलांना भेटल्यानंतर मात्र काही क्षणांसाठी हे सगळं विसरून त्यांच्यासोबत खूप सुंदर आणि मनापासूनचे क्षण अनुभवता आले. त्यांच्यासोबत वेळ घालवताना जाणवलं की, आनंद मिळवण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खरा आनंद दडलेला असतो. त्यांच्या निरागसपणाने आणि प्रेमाने मनाला खूप स्पर्श केला.”

यापुढे योगिता चव्हाण म्हणाली की, “या मुलांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत हे काही क्षण घालवण्याची संधी मिळाली, यासाठी देवाचे आणि सन मराठीच्या टीमचे मनापासून आभार. आम्हाला आनंद झाला की नाही, यापेक्षा आमच्या येण्याने या मुलांना किती आनंद झाला असेल, त्यांच्या चेहऱ्यावर काही वेळासाठी का होईना, पण हसू आलं असेल, हा विचारच आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून आम्हाला मिळालेलं समाधान शब्दांत सांगणं खरंच कठीण आहे. कदाचित आमच्यासाठी हा फक्त काही तासांचा अनुभव असेल, पण आमच्या या छोट्याशा भेटीने त्यांच्या आयुष्यातला एखादा सुंदर क्षण तयार झाला असेल, तर त्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी दुसरी कोणतीच नाही.”

A. R. Rahman: शेखर कपूर यांच्या मासूम: द नेक्स्ट जनरेशनसाठी ३ गाणी केली ए. आर. रहमानने रेकॉर्ड

Web Title: Sun marathi actors raksha bandhan special children school mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • marathi actor
  • Raksha Bandhan 2026
  • sun marathi

संबंधित बातम्या

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
1

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख
2

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.