
फोटो सौजन्य - Social Media
गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्रासाठी एक नवीन सुरुवात! महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधव या दिवशी आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करत असतात. हा योग्य दरवर्षी येतो आणि या योगाला साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानले जाते. त्यामुळे या दिवशी बहुतेक जण घरात काही तरी नवीन वस्तू आणणे किंवा खरेदी करणे या गोष्टी सुरुच असतात. अशामध्ये मराठी मनोरंजन विश्वातील काही महत्वाच्या घटकांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चक्क व्यवसायाचीच गुढी उभारली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी बिग बॉस फेम शिव ठाकरेने ‘Amraa Studio Salons’ या नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे.
Amraa Studio Salons, अर्थातच एक सलून असून त्याचे मालक स्वतः बिग बॉस फेम शिव ठाकरे आहेत. शिवच्या या नव्या उपक्रमाला त्याच्या चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे, तसेच मराठी सिनेक्षेत्र असुद्या किंवा हिंदी सिनेक्षेत्र असुद्या, अनेक कलाकारांनी शिवच्या या नव्या उपक्रमात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत आणि अभिनंदन केले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी एका नव्या व्यवसायाला सुरुवात करणे ही खरंच त्याच्या चाहत्यांसाठी फार आनंदाची बातमी आहे. हे सोशल मीडियावर नक्कीच दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी शिवने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तो त्याच्या आजीला Under Construction असणाऱ्या Amraa Studio Salons ची सफर घडवत होता आणि अगदी 4 ते 5 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुढीपाडव्याच्या दिवशी शिव ने त्याच्या आजीच्याच हस्ती या व्यवसायाचे लोकापर्ण केले आणि Amraa Studio Salons ग्राहकांसाठी खुले केले. या लोकापर्ण सोहळ्यामध्ये शिवबरोबर मूळचा अमरावतीकर असणारा बिग बॉस फेम roshan भजनकरही दिसून आला. शिव ठाकरेचे Amraa Studio Salons हे अमरावतीमध्ये स्थित आहे.
अनेक महिन्यांपासून Amraa Studio Salons च्या @amraastudiosalons या ऑफिशिअल इंस्टाग्राम हँडलवर भरतीच्या काही पोस्ट शेअर केल्या जात आहेत. त्यामुळे अमरावती तसेच शेजारील परिसरात स्थित असलेले आणि सलून क्षेत्रात अनुभवी असणाऱ्या अनुभवींना Amraa Studio Salons मध्ये संधी हवे असेल तर नक्कीच त्यांच्या @amraastudiosalons या पेजला भेट द्या.