
फोटो सौजन्य - Social Media
ना मोठा सोहळा, ना गाजावाजा! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचा साधेपणाने पार पडला विवाहसोहळा; फोटो व्हायरल
दरम्यान, पोस्टमध्ये भावूक असलेल्या अरबाजने आर्थिक मदतीसाठी विनंतीही केली. अशामध्ये राजकीय क्षेत्रातून अभिनेत्याला आर्थिक मदत येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने अभिनेता अरबाज शेख यांच्या वडिलांच्या उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यावेळी अरबाजच्या हाती रक्कम सुपूर्त करताना विद्यमान उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अरबाजला रक्कम देण्यात आली.
अरबाजच्या चाहत्यांनी वडिलांसाठी केली प्रार्थना!
शिवसेना शिंदे गटाकडून मदत जाहीर झाल्याने अभिनेत्याला आर्थिक आधार मिळाला आहे. तसेच त्याचे चाहते त्याला भावनिक आधार देत आहेत. आर्थिक मदत मिळाल्यामुळे चाहतेमंडळी अभिनेत्यासाठी खुश आहेत. तसेच त्याच्या वडिलांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.
नुकताच पार पडला विवाहसोहळा!
अगदी महिनाभरापूर्वी अभिनेता अरबाज शेख याने लग्न उरकले. बालपणीची मैत्रीण सिमरनसोबत त्याने विवाहबंधन बांधले आहे. कसलीही चाहूल न देता अभिनेत्याने लग्नानंतरच लग्नाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली.