Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tusshar Kapoor: तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन; ५ कोटींची खंडणी मागितल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

Tusshar Kapoor: अभिनेता तुषार कपूरकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागणारा धमकीचा फोन आला होता. मात्र, मुंबई पोलिसांच्या तपासात कॉलमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या ऑडिओ सॅम्पलशी जुळला नाही. जाणून घ्या प्रकरणाचा तपशील.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 03, 2026 | 11:16 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tusshar Kapoor:  बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींना धमकीचे फोन येण्याचे सत्र सुरूच आहे. अभिनेता तुषार कपूरलाही ५ कोटी रुपयांची खंडणी मागणारा धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य अशी करून दिली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात या धमकीच्या कॉलमधील आवाज आणि हॅरी बॉक्सरच्या मूळ ऑडिओ सॅम्पलमध्ये साम्य नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा कॉल बनावट असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तुषार कपूरकडे मागितले ५ कोटी रुपये

मिळालेल्या माहितीनुसार, हॅरी बॉक्सर नावाच्या व्यक्तीने तुषार कपूरला धमकीचा फोन करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या कॉलमध्ये संबंधित व्यक्तीने आपण लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगितले होते. या धमकीच्या फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग तपासासाठी महत्त्वाचे ठरले आहे.

तुषार कपूरने या घटनेची माहिती तातडीने मुंबई पोलिसांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला असून, त्याची जबाबदारी खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली.

ऑडिओ सॅम्पलची जुळवणी केली, पण…

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तांत्रिक पथकाने तुषार कपूरला मिळालेल्या धमकीच्या कॉलमधील आवाजाची तपासणी केली. तसेच, हा आवाज त्यांच्या डेटाबेसमध्ये उपलब्ध असलेल्या हॅरी बॉक्सरच्या मूळ ऑडिओ सॅम्पलशी जुळवून पाहण्यात आला.

मात्र, दोन्ही ऑडिओ सॅम्पल्समध्ये साम्य आढळले नसल्याची माहिती पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे प्राथमिक तपासात हा धमकीचा कॉल बनावट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिश्नोई गँगचे नाव वापरून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एखाद्या उपद्रवी व्यक्तीने केला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू

सध्या मुंबई पोलीस धमकीचा ऑडिओ पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. या प्रकरणामागे एखाद्या व्यक्तीचा हात आहे की संघटित टोळीचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, तुषार कपूर हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर कुटुंबातील सदस्य आहे. तो ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि निर्मात्या शोभा कपूर यांचा मुलगा आहे. त्याची बहीण एकता कपूर ही हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील प्रसिद्ध निर्माती आहे.

Mahalakshmi Ravinder: महालक्ष्मी अन् रविंदर पुन्हा चर्चेत; पैशांसाठी निर्मात्याशी दुसरं लग्न केलं? अभिनेत्रीने पोस्ट करत दिलं उत्तर

Web Title: Tusshar kapoor bishnoi gang threat call 5 crore extortion police investigation ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • Actor
  • entertainment
  • Lawrence bishnoi Gang

संबंधित बातम्या

Jay Jay Swami Samarth: सहा वर्षांचा भक्तिमय प्रवास, २००० भागांचा टप्पा पूर्ण; सुनील गोडसेंनी अक्कलकोटमध्ये घेतले स्वामींचे दर्शन!
1

Jay Jay Swami Samarth: सहा वर्षांचा भक्तिमय प्रवास, २००० भागांचा टप्पा पूर्ण; सुनील गोडसेंनी अक्कलकोटमध्ये घेतले स्वामींचे दर्शन!

Mahalakshmi Ravinder:महालक्ष्मी अन् रविंदर पुन्हा चर्चेत; पैशांसाठी निर्मात्याशी दुसरं लग्न केलं? अभिनेत्रीने पोस्ट करत दिलं उत्तर
2

Mahalakshmi Ravinder:महालक्ष्मी अन् रविंदर पुन्हा चर्चेत; पैशांसाठी निर्मात्याशी दुसरं लग्न केलं? अभिनेत्रीने पोस्ट करत दिलं उत्तर

Kon Honaar Crorepati: नऊवारी साडीत माधुरी दीक्षितची दिमाखदार एन्ट्री; ‘या’ दोन अभिनेत्रींच्या गप्पांनी रंगणार करोडपतीचा मंच!
3

Kon Honaar Crorepati: नऊवारी साडीत माधुरी दीक्षितची दिमाखदार एन्ट्री; ‘या’ दोन अभिनेत्रींच्या गप्पांनी रंगणार करोडपतीचा मंच!

Ramayana: ‘रामायण’च्या स्टारकास्टमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण? रणबीर कपूरपासून यशपर्यंत जाणून घ्या कलाकारांची संपत्ती
4

Ramayana: ‘रामायण’च्या स्टारकास्टमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण? रणबीर कपूरपासून यशपर्यंत जाणून घ्या कलाकारांची संपत्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.