Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adhokshaj Karhade : बारसं झालं हा! अभिनेता अधोक्षज कऱ्हाडेच्या बाळाचं नाव आले समोर; उच्चारायला कठीण पण बाबाने दिले टिप्स

अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे बाबा झाला असून 10 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या घरी बाळाचा जन्म झाला. यामुळे संकर्षण कऱ्हाडे काका झाला असून कऱ्हाडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 14, 2026 | 02:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे बाबा झाला. तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे काका झाला.
  • बाळाची नामकरण विधी पार पडली
  • बाबा अधोक्षज आणि आई चैतालीने गोंडस पिल्याला कुशीत घेतले आहे
10 फेब्रुवारी 2026 रोजी, कऱ्हाडे कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन झाले. अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे बाबा झाला. तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे काका झाला. नुकतीच, बाळाची नामकरण विधी पार पडली. अभिनेता अधोक्षज कऱ्हाडेने त्याच्या सोशल मीडिया हॅन्डल @adhokshaj1989 च्या माध्यमातून बाळाचे नाव जाहीर केले. बाळाचे नाव ‘अक्षोभ्य’ ठेवण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये ‘चि. अक्षोभ्य चैताली अधोक्षज कऱ्हाडे!’ असे पूर्ण नाव लिहीत बाळाचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

‘रूबाब’ आता मराठी ZEE5 वर पहा, काय आहेत 5 खास कारणं; ड्रामा, भावना, कथा सर्वच एका क्लिकवर

Instagram Post च्या माध्यमातून दिली आनंदाची बातमी!

गडद जांभळ्या रंगाचा पारंपरिक वेष परिधान करून, बाबा अधोक्षज आणि आई चैतालीने गोंडस पिल्याला कुशीत घेतले आहे. मागे, मोठ्या अक्षरात बाळाचे नाव ‘अक्षोभ्य’ लिहले आहे. त्याभोवती फुलांची सजावट आहे. या सुंदर क्षणांना अधोक्षज कऱ्हाडेने त्याच्या सोशल मीडिया ID वर शेअर केले आहेत. त्याखाली कॅप्शन लिहीत बाळाच्या या नावाबद्दल भलीमोठी माहिती दिली आहे. पोस्टखाली कॅप्शनमध्ये नमूद आहे की, “लेकराचं बारसं झालं! नाव: चि. अक्षोभ्य चैताली अधोक्षज कऱ्हाडे! अर्थ: जो कधीही क्षुब्ध (अस्वस्थ) होत नाही. मनाने शांत आणि बुद्धीने स्थिर असणारा. कोणत्याही परिस्थितीत विचलित न होणारा. आता काही जणांना नाव अवघड वाटत असेल. पण कुठलचं नाव अवघड नसतं अहो. मुद्दा ते नाव घेण्याच्या सवयीचा असतो. म्हणून बघा बरं ५ वेळेला. सहज जमेल! बाकी शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम सोबत राहुद्या!”

एकंदरीत, जो कोणत्याही परिस्थितीमध्ये अस्वस्थ होत नाही. डचमळून जात नाही, नेहमी स्थिर असणारा! असा अर्थ ‘अक्षोभ्य’ या नावाचा आहे. बाळाचे नाव ऐकून अधोक्षजच्या चाहतेमंडळींनी कमेंट्समध्ये त्यांची मते मंडळी आहेत. अनेक चाहत्यांना बाळाचे नाव फार आवडले असल्याचे दिसले आहे. तर काही चाहत्यांना ‘अक्षोभ्य अधोक्षज कऱ्हाडे’ हे एक प्रकारचे tongue twister वाटत आहे.

ZEE5 वरील ‘अंधा प्यार 2.0’ मध्ये झळकलेला Pawan Choure ‘पिक्चर बॉईज’ मधून थिएटरमध्ये झळकणार! 

बाबा अधोक्षजच्या नावाचा अर्थ काय?

अभिनेता अधोक्षजचे नावही नेहमी चर्चेत असते. पण या नावाचा अर्थ काय? तर ‘ते जे आपल्या ज्ञानेंद्रियांच्या अनुभवाच्याही पलीकडचे आहे.’

10 फेब्रुवारी 2026 रोजी, अभिनेता अधोक्षज कऱ्हाडेला बाळ झाल्याची बातमी स्वतः अधोक्षजने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. बाळाच्या नामकरणाचीही बातमी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून बाळाला मोठ्या आशीर्वाद मिळत आहेत आणि आईवडिलांचे अभिनंदन केले जात आहेत.

Web Title: What is the name of the son of marathi serial actor adhokshaj karhade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.