Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yad Lagla Song: ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम पूजा चव्हाणचा नवा अंदाज; आकाश यादवसोबतचं ‘याड लागलं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Yad Lagla Song: पूजा चव्हाण आणि आकाश यादव यांचं ‘याड लागलं’ हे रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. साताऱ्यातील दुर्गळवाडीमध्ये चित्रीकरण झालेल्या या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 21, 2026 | 11:36 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Yad Lagla Song: प्रेमाच्या रंगांनी सजलेलं आणि मनाला भावणारं नवं मराठी रोमँटिक गाणं ‘याड लागलं’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अभिनेत्री पूजा चव्हाण आणि अभिनेता आकाश यादव यांची नवी जोडी या गाण्यात पाहायला मिळत असून, गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नवं मराठी रोमँटिक गाणं ‘याड लागलं’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री पूजा चव्हाण आणि अभिनेता आकाश यादव यांची केमिस्ट्री ‘याड लागलं’ या गाण्यात पाहायला मिळते. साधं, निस्वार्थ प्रेम आणि भविष्याची स्वप्नं रंगवणाऱ्या दोन तरुण प्रेमीयुगुलांची कथा या गाण्यातून मांडण्यात आली आहे. साताऱ्यातील दुर्गळवाडी येथील निसर्गरम्य परिसरात या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.

समाधान पवार, सुबोध गोतपागर, शुभम यादव आणि आकाश यादव यांनी ‘याड लागलं’ या गाण्याची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. गाण्याला दर्शन सुतार यांनी संगीत दिलं असून गायक निखिल मधाळे यांनी आपल्या आवाजाने ते सजवलं आहे. गाण्याची गीतरचना आकाश यादव यांनी केली आहे.

Vaishali Samant: वैशाली सामंतच्या भावस्पर्शी स्वरांनी सजलं ‘उभी तुझ्या गाभारी मंगेशा’; श्रावणासाठी खास भक्तिगीत

गाण्याच्या चित्रीकरणाची जबाबदारी सचिन घाटगे यांनी सांभाळली असून, व्हिडीओ एडिटिंग आकाश यादव यांनी केलं आहे. रूपेश जाधव यांनी मेकअप, तर दत्तात्रय पवार यांनी हेअर आर्टिस्टची जबाबदारी सांभाळली आहे.

मराठी वर्ल्ड प्रोडक्शनच्या बॅनरखाली हे गाणं तयार करण्यात आलं आहे. गाण्याविषयी बोलताना आकाश यादव यांनी सांगितलं की, आजच्या सोशल मीडियाच्या युगात निस्वार्थ प्रेम करणारी माणसं सहज मिळत नाहीत. गावातील दोन प्रेमीयुगुलांच्या साध्या आणि सुंदर प्रेमाची कथा या गाण्यातून दाखवण्यात आली आहे.

प्रेक्षकांचा गाण्याला चांगला प्रतिसाद

‘याड लागलं’ हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावरही गाण्याची चर्चा सुरू आहे. गाणं इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगला गेल्याचा दावा आकाश यादव यांनी केला आहे. तसेच त्यांनी चाहत्यांना गाण्यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन केलं आहे.

Adinath Kothare: ‘रामायण’नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग-बजेट सिनेमात वर्णी; साकारणार खास भूमिका

Web Title: Yad lagla song pooja chavan akash yadav romantic song viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Song

संबंधित बातम्या

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
1

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज
2

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
3

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
4

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.