Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“लवकर नीजे, लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे, जैविक घड्याळ पाळा, आरोग्यवान व्हा!

खरं तर तुमच्या शरीरात एक जैविक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 16, 2022 | 01:28 PM
“लवकर नीजे, लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे, जैविक घड्याळ पाळा, आरोग्यवान व्हा!
Follow Us
Close
Follow Us:

झोप (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? असे ऐकीवात आहे की “लवकर नीजे, लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे ” हे किती खरे आहे ? ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही का चालणार ? चला पाहूया….

खरतर तुमच्या शरीरात एक जैविक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.

रात्री ११ ते पहाटे ३ या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात (Liver) रोखलेलीअसते.
तुमचे यकृतात अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची (Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते.

तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या रात्री ११ ते पहाटे ३ च्या वेळेत होत असते.
तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही.

जर तुम्ही रात्री ११ वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण ४ तासांचा वेळ मिळतो.
जर १२ वाजता झोपलात तर ३ तास
जर १ वाजता झोपलात तर २ तास आणि जर २ वाजता झोपलात तर फक्त १ तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी…..
आणि जर तुम्ही पहाटे ३ नंतर झोपलात तर ?

तर दुर्दैवाने तुमच्या शरीराला खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ मिळणार नाही.

जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर ही विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात कालानुक्रमे वाढत जातील.. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल ?

ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता.

पहाटे ३ ते ५ वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते. ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे ?

खरतर, तुम्ही शारिरीक हालचाली, व्यायाम, आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋणभाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते.

सकाळच्या ५ ते ७ ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. आता तुम्ही काय करायला हवे ?

तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा.

सकाळी ७ ते ९ च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते. आता तुम्ही काय करायला हवे ?

तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते.

असा आहे तुमचा दिवस उत्तम प्रकारे सुरु करण्याचा आणि आरोग्य टिकवण्याचा राजमार्ग….

ग्रामीण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे हे वेळापत्रक पाळतात. म्हणून ते सदृढ असतात. शहरात रहात असताना मात्र आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युतप्रकाश, टी व्ही आणि मोबाईल गेम्स्, WhatsAap, Facebook, ईंटरनेट इ. आहेत. पण त्यामध्ये आपण जास्त व्यस्त असल्यामुळे आपली अमुल्य अशी झोपेची वेळ आपण पाळत नाही.

पण आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना एकदा तुम्हाला शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाली तर ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत राहा.

जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर, कोणी जरी जास्त पगार दिला तरी ती नोकरी नाकारण्याचा मी सल्ला देईन. दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील हे लक्षात ठेवा.

ह्याप्रकारे जास्तीत जास्त प्रमाणात वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक अशा प्रकारे तयार कराल तर मला खात्री आहे तुम्ही संपूर्ण दिवस अधिक उत्साही, ताजेतवाने रहाल आणि दीर्घआयुषी व्हाल!

Web Title: Get up early get up early get well soon follow the biological clock be healthy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2022 | 01:28 PM

Topics:  

  • Good for Health
  • Live Long

संबंधित बातम्या

पूर्वज खरंच 100 वर्ष जगत होते का? डाएटिशनने ठरवला दावा फोल, कसा ते जाणून घ्या
1

पूर्वज खरंच 100 वर्ष जगत होते का? डाएटिशनने ठरवला दावा फोल, कसा ते जाणून घ्या

लहान मुलांना वेळीच ‘या’ सवयी लावा… मॅच्युरिटी वाढेल, लोक तुमचे कौतुक करतील
2

लहान मुलांना वेळीच ‘या’ सवयी लावा… मॅच्युरिटी वाढेल, लोक तुमचे कौतुक करतील

ऐक, भाई…! जास्त फोन चालवत नको जाऊस; नुकसान ऐकशील तर धक्का बसेल
3

ऐक, भाई…! जास्त फोन चालवत नको जाऊस; नुकसान ऐकशील तर धक्का बसेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.