
सिमेन्स हेल्थकेअर प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक, हरीहरन सुब्रमणियन म्हणाले, “लवकर आणि अचूक निदान केल्यास परिणाम सुधारु शकतात, योग्य वेळी उपचार मिळू शकतात आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रभावी व्यवस्थापन करता येते. डॉक्टर्स रुग्ण आणि त्यांची देखभाल करणाऱ्यांच्या अडचणी समजून, त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील अशा उपाययोजना देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. या जागरूकता मोहिमेद्वारे प्रत्येक रुग्ण आणि त्याची देखभाल करणाऱ्याला वैद्यकीय सल्ल्यानुसार इमेजिंग प्रक्रियेला आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे ह्यासाठी आवश्यक जाणकारी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि विश्वासार्ह बनवणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे.”
प्रगत तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांचा अनुभव कसा सुधारता येईल ह्यावर लक्ष केंद्रित करून, सर्वांसाठी, सर्वत्र आणि शाश्वत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी ह्यासाठी सिमेन्स हेल्थीनिर्स प्रतिबद्ध आहे.सिमेन्स हेल्थीनिर्सच्या झोन इंडियाचे कम्युनिकेशन्स प्रमुख, प्रणव पाटील यांनी सांगितले की ‘‘जाणकारी असेल तर दिलासा मिळेल ह्या मोहिमेद्वारेआम्हाला रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना स्कॅन पूर्वी आणि स्कॅन दरम्यान योग्य माहिती मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल याची हमी द्यायची आहे. आजचे डायग्नॉस्टिक इमेजिंग प्रगतच नाही तर पूर्वीच्या तुलनेत रुग्णांसाठी खूप अधिक सुलभ आणि आरामदायीही आहे. अनेक भाषांमध्ये सोपी, संबंधित आणि सहज माहिती उपलब्ध करून देऊन भारतातील विविध समुदायांपर्यंत पोहोचण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.”ही सर्वसमावेशक मोहिम डिजिटल, ऑफ लाईन, वृत्तपत्र तसेच इतर महत्वाच्या माध्यमांद्वारे एकत्रितपणे राबवण्यात येत आहे.
रुग्णांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञान कसे विकसित झाले आहे हे अधोरेखित करण्यासाठी व्हिडिओ सामग्री तयार करण्यात आली आहे. प्रत्येक व्हिडिओ मालिकेत विविध स्कॅन प्रकारांमध्ये तंत्रज्ञान सोप्या, संबंधित आणि समजण्यास सोप्या पद्धतीने समजावले गेले आहे.“जाणकारी असेल तर दिलासा मिळेल” या जागरूकता व्हिडिओंची संपूर्ण मालिका कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.