Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Menstrual Hygiene Day : ‘वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे’ निमित्त धारावीत विशेष शिबिर संपन्न!

‘वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे’ निमित्त धारावीत आयोजित विशेष जनजागृती शिबिरात २००० हून अधिक महिला आणि किशोरवयीन मुलींनी सहभाग घेतला. Navbharat Mega Developers Private Limited (एनएमडीपीएल) यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता, महिला आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 28, 2026 | 09:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

‘वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे’ निमित्त धारावीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष जनजागृती शिबिरात २००० हून अधिक महिला आणि किशोरवयीन मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. Navbharat Mega Developers Private Limited (एनएमडीपीएल) यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता, महिला आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. धारावी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स क्लब येथे पार पडलेल्या या शिबिरामध्ये महिलांनी मोकळेपणाने संवाद साधत विविध आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली.

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral

या शिबिरात Family Planning Association of India आणि Tata Memorial Hospital येथील तज्ज्ञ डॉक्टर, समुपदेशक आणि कर्करोगतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. मासिक पाळीशी संबंधित गैरसमज, कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच वेळेत उपचार घेण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली. महिलांना सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरणात वैयक्तिक समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

एनएमडीपीएलच्या ‘स्वास्थ्य साथी’ मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षभरात धारावीतील सुमारे १० हजार महिला आणि किशोरवयीन मुलींचे समुपदेशन करण्यात आले आहे. विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

या शिबिरामध्ये केवळ मार्गदर्शनच नव्हे तर महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरणही करण्यात आले. धारावीसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात स्वच्छतेच्या सवयी प्रत्यक्षात आणणे कठीण असले तरी अशा उपक्रमांमुळे महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना स्थानिक महिलांनी व्यक्त केली.

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

महिलांनी या शिबिरांचे विशेष कौतुक करत, येथे कोणताही संकोच न बाळगता प्रश्न विचारता येतात आणि आरोग्याविषयी मोकळेपणाने चर्चा करता येते, असे सांगितले. तज्ज्ञांशी थेट संवाद साधल्याने अनेक शंका दूर झाल्याची प्रतिक्रियाही सहभागी महिलांनी दिली.

एनएमडीपीएलच्या मते, धारावीतील महिलांपर्यंत योग्य आरोग्य माहिती, आवश्यक सुविधा आणि जागरूकता पोहोचवून त्यांना अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘धारावी स्वास्थ्य साथी’ हा उपक्रम महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि आरोग्यविषयक संवादासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनत असून समुदाय-केंद्रित आरोग्य जनजागृतीवर भविष्यातही भर दिला जाणार आहे.

Web Title: Special camp held in dharavi on the occasion of world menstrual hygiene day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • latest news
  • marathi latest news

संबंधित बातम्या

जाहिरात क्षेत्रातील नियमभंगात २१ टक्क्यांची वाढ! ‘या’ क्षेत्रांमध्ये नियम उल्लंघनाचे प्रमाण जास्त
1

जाहिरात क्षेत्रातील नियमभंगात २१ टक्क्यांची वाढ! ‘या’ क्षेत्रांमध्ये नियम उल्लंघनाचे प्रमाण जास्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.