आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
त्यांच्या या आवाहानाचा सन्मान करत एक मोठा बदल पाहायाल मिळला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ५ ते ७ किलोमीटरच्या अंतरासाठी सायकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत याची घोषणाही केली आहे. त्यांनी म्हटले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहानेने प्रेरित होऊन ५ ते ७ किलोमीटरच्या परिसरात सायकलचा वापर सुरु केला आहे. पेट्रोल-डिझेल वाचवण्याच्या दिशेने हे माझे एक छोटेसे पाऊल आहे. यामुळे निरोगीजीवनशैलीही जपली जाईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यापूर्वी अमृता फडणवींसांनी राष्ट्रहितासाठी आपला वैयक्तिक लाभ बाजूल ठेवत कान्सचा दौराही रद्द केला होता. त्यांनी पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहानाला प्रतिसाद देत महाराष्ट्राची संस्कृती आणि हातमाग वारसा सादर करण्यासाठी मिळालेले निमंत्रण नाकारले होते. त्यांनी राष्ट्र प्रथम ला प्राधान्य दिले होते. आता सायकलवर स्वार होऊन इंधन बचतीचा संदेश देत राष्ट्र प्रथमाला प्राधान्य दिले आहे. त्यांनी कान्स फेस्टिव्हलचा दौरा रद्द केल्या त्यावेळी म्हटले होते की, मला मुंबईच्या सामान्य नागरिकांसारखंच जगायचे आहे.
व्हायरल व्हिडिओ
Inspired by PM Narendra Modi ji’s call for fuel conservation, I have started using a bicycle for all work within a 5-7 km radius from my home. It is a small personal step towards saving petrol and diesel, while also embracing a healthier lifestyle. Sometimes, meaningful change… pic.twitter.com/4PuwCZqwhZ — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 27, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी त्यांच्या कृतीचे कौतुक केले आहे. तर काहींनी यावर टीकाही केली आहे. परंतु, अमृता फडणवीसांनी आपल्या कृतीतून राष्ट्र प्रेम दाखवून दिले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






