शरीरातील कॅल्शियम खेचून काढतात हे घातक पदार्थ, उरतो फक्त हाडांचा सापळा, त्वरित सेवन टाळा
सदृढ आरोग्यासाठी आपल्या आरोग्याला काही पोषकतत्वांची आवश्यकता असते. कॅल्शियम हे त्यातीलच एक आहे. आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम मोठी मदत करत असत. मजबूत हाडे आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात काम करण्यासाठी ऊर्जा, स्थिरता आणि क्षमता प्रदान करत असतात. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे, आजकाल अनेकांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू लागली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, आपला आहार. आजकाल बाहेरचे नको असलेले आणि आरोग्याला हानिकारक ठरत असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करू लागले आहेत ज्याचा त्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की, गोड पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स, जंक फूड, आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा आपल्या वाईट परिणाम होत असतो. हे पदार्थ आपल्या शरीरातील पोषक घटकांचा नाश करत असतात. यामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या कॅल्शियम आणि खनिजांची कामातरता निर्माण होते. आजच्या या आधुनिक जीवनशैलीत आरोग्यास घातक ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन फार वाढले आहे. हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत असतात. आज आपण या लेखात आपल्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी करणाऱ्या काही पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे सेवन वेळीच तयाला हवे.
या लक्षणांना दुर्लक्षित करू नका, महिनाभर आधी आपले डोळे देत असतात हार्ट अटॅकचे भयंकर संकेत
सॉफ्ट ड्रिंक्स
सॉफ्ट ड्रिंक्स आणि गोड पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण फार जास्त असते. हे असे साखरयुक्त पदार्थ आपल्या आरोग्यसाठी अपायकारक ठरत असतात. यामुळे आपल्या शरीरातील हाडे कमकुवत पडत असतात. या पदार्थांमुळे शरीरात फॉस्फरिक ऍसिडचे प्रमाण वाढते, जे कॅल्शियमचे शोषण कमी करते, ज्यामुळे हाडे कमजोर होतात. अशा पदार्थांचे सतत सेवन करणे हाडांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आपल्या तोंडाचे चोचले पूर्ण करताना आरोग्याची काळजी करणेही तितकेच गरजेचे आहे.
प्रक्रिया केलेले पदार्थ
जंक फूड जसे की, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज अशा पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स सारखे काही घटक असतात जे आपल्या हांडांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असतात. या पदार्थांमुळे शरीरात जळजळ निर्माण होऊन शरीरातील कॅल्शियमची पातळी हळूहळू कमी होऊ लागते. अशा पदार्थांचे सततचे सेवन आपली हाडे कमकुवत बनवू शकतात, यामुळे आपले वजनही झपाट्याने वाढते. त्यामुळे रोजच्या जीवनात यांचे सेवन करू नये. तुम्ही पर्यायी फ्रेश भाज्या आणि फळे खाण्यावर भर देऊ शकता.
अल्कोहोलचे सेवन
अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन हाडांवर गंभीर परिणाम करत असते. अल्कोहोल शरीरातील कॅल्शियम शोषण्याची प्रक्रिया कमी करते, यामुळे हांडांची घनता कमी होते. सततचे अल्कोहोलचे सेवन हांडांच्या विविध समस्या निर्माण करू शकते. अल्कोहोलचे सेवन आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम घडवून आणत असते त्यामुळे वेळीच याचे सेवन कमी करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.