
अनेकदा न्यायालयात चालु असलेल्या खटल्यांचा निकाल उशीरा लागल्याचे आपण अनेकदा पाहिलं आहे. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील लखनऊ (Lucknow) येथे उघडकीस आला आहे. मात्र, या खल्याल्याचा निकाल येईपर्यंत एक-दोन नव्हे तर तब्बल 32 वर्ष लागली आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील विशेष सीबीआय न्यायालयाने (Special CBI Court) गुरुवारी (2 फेब्रुवारी) 100 रुपयांच्या 32 वर्ष जुन्या लाच प्रकरणात 82 वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे लिपिकाला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच वृद्धांकडून दंडही वसूल करण्यात आला.
[read_also content=”गौतम अदानीच्या ज्याने नाकी नऊ आणले तो हिंडेनबर्गचा अहवाल म्हणजे नेमकं काय? कंपनीचा मालक कोण, कशाप्रकारे काम करते कंपनी! https://www.navarashtra.com/india/get-to-know-about-hindenburg-reports-chaalenged-to-gautam-adani-networth-nrps-367264.html”]
1991 मध्ये उत्तर रेल्वेचे सेवानिवृत्त लोको ड्रायव्हर राम कुमार तिवारी यांनी या प्रकरणी सीबीआयकडे एफआयआर दाखल केला होता. तिवारी यांनी एफआयआरमध्ये आरोप केला होता की, त्यांच्या पेन्शनची गणना करण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी आवश्यक होती. या कामासाठी वर्मा यांनी 150 रुपयांची लाच मागितली होती. नंतर 100 रुपये मागितले. सीबीआयने लाचेच्या रकमेसह वर्माला रंगेहात अटक केली होती. सीबीआयने तपास पूर्ण केल्यानंतर वर्मा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने वर्मा यांच्यावर 30 नोव्हेंबर 2022 रोजी आरोप निश्चित केले होते.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश अजय विक्रम सिंह यांनी दोषी राम नारायण वर्मावर कोणतीही उदारता दाखवण्यास नकार दिला. दोषीने वृद्धापकाळाचा हवाला देत शिक्षेत सवलत देण्याची विनंती केली होती. मात्र, असे केल्याने समाजात चुकीचा संदेश जाईल, असे न्यायमूर्ती म्हणाले. न्यायालयाने दोषी राम नारायण वर्माला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
आरोपी वर्मा यांनी न्यायाधीशांसमोर याचिका केली की, ही घटना 32 वर्षांपूर्वी घडली होती आणि या प्रकरणात त्यांनी जामिनावर सुटण्यापूर्वी दोन दिवस तुरुंगात काढले होते. त्याने युक्तिवाद केला की त्याची शिक्षा आधीच कारागृहात घालवलेल्या कालावधीपर्यंत मर्यादित असू शकते. दोषीची याचिका फेटाळताना न्यायाधीशांनी सांगितले की, लाचेची रक्कम, गुन्ह्याचे स्वरूप आणि इतर बाबी लक्षात घेता या प्रकरणात दोन दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा पुरेशी नाही आणि एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा पूर्ण होईल.