Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका आता ऑनलाईन तपासता येणार; CBSE ने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

'सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन' (सीबीएसई) ने मोठा निर्णय घेतला आहे. आता सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिका (Answersheet) ऑनलाईन तपासू शकतील. तसेच त्यांना उत्तरपत्रिकेवर दिलेल्या गुणांचे मूल्यांकन करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे ते उत्तरपत्रिकेतील गुण पाहू शकतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 29, 2024 | 12:18 PM
दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका आता ऑनलाईन तपासता येणार; CBSE ने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ (सीबीएसई) ने मोठा निर्णय घेतला आहे. आता सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिका (Answersheet) ऑनलाईन तपासू शकतील. तसेच त्यांना उत्तरपत्रिकेवर दिलेल्या गुणांचे मूल्यांकन करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे ते उत्तरपत्रिकेतील गुण पाहू शकतील. बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू होईल. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 500 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

सीबीएसईने उमेदवारांना कमी गुण मिळाल्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोर्डाच्या वेबसाईटवर एक लिंक दिली जाईल, ज्याद्वारे विद्यार्थी नोंदणी केल्यानंतर परीक्षकांनी दिलेले गुण तपासू शकतील. लिंक ओपन झाल्यानंतर फक्त पाच दिवसांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती देखील घेऊ शकतात. यासाठीही अर्ज करावा लागेल. यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिविषय 700 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रति विषय 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

…तर परीक्षकांवर कारवाई

एखाद्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत कमी गुण दिल्याचे आढळून आल्यास अशा परीक्षकांवर बोर्ड कारवाई करेल. हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सीबीएसईचा निकाल जाहीर होऊ शकतो. यावेळीही गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या एकूण गुणांची माहिती दिली जाईल.

Web Title: 10th and 12th answer sheets can now be checked online cbse took big decision nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2024 | 12:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.