Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुबेरेश्वर धाममध्ये पुन्हा मोठी दुर्घटना; कावड यात्रेत सहभागी झालेल्या चार भाविकांचा मृत्यू

प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या कावड यात्रेदरम्यान, गर्दी आणि अस्वस्थतेमुळे चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाममध्ये ही घटना घडली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Aug 06, 2025 | 09:52 PM
कुबेरेश्वर धाममध्ये पुन्हा मोठी दुर्घटना; कावड यात्रेत सहभागी झालेल्या चार भाविकांचा मृत्यू

कुबेरेश्वर धाममध्ये पुन्हा मोठी दुर्घटना; कावड यात्रेत सहभागी झालेल्या चार भाविकांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र आहे. परंतु गेल्या दोन दिवसांत इथे मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या कावड यात्रेदरम्यान, गर्दी आणि अस्वस्थतेमुळे चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. या यात्रेत देशभरातून सुमारे पाच लाख भाविक सहभागी झाले होते.

उत्तरकाशीत मोठी दुर्घटना; ढगफुटी नंतर गावावर कोसळली दरड, २० सेकंदात सर्वकाही उदध्वस्त

कुबेरेश्वर धाम हे भगवान शंकराला समर्पित एक महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ मानले जाते. येथे दरवर्षी लाखो भक्त रुद्राक्ष प्राप्तीसाठी तसेच शिवभक्तीच्या हेतूने गर्दी करतात. यंदाची कावड यात्रा विशेष भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. यात्रेचा मार्ग सीवन नदीपासून कुबेरेश्वर धामपर्यंत निश्चित करण्यात आला होता. पण, या भव्य आयोजनात आवश्यक ती नियोजनशीर व्यवस्था न झाल्यामुळे गर्दीचा ताण आणि गैरसोयींचा सामना भाविकांना करावा लागला.

मंगळवारी दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील जसवंतीबेन (५६) आणि उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील संगीता गुप्ता (४८) या दोन महिला गर्दीत चेंगरल्याने बेशुद्ध पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली होती.

या घटनेच्या केवळ दुसऱ्याच दिवशी, बुधवारी आणखी दोन भाविकांनी प्राण गमावले. गुजरातमधील पाचवल येथील चतुर सिंह (५०)  एका हॉटेलसमोर उभे असताना अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. तर हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील ईश्वर सिंह (६५) हे कुबेरेश्वर धामाच्या आवारातच अचानक चक्कर येऊन पडले आणि त्यांचीही प्राणज्योत मालवली. दोघांचे मृतदेह सध्या सीहोर जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, २७५ जणांचा मृत्यू; २५४ रस्ते आणि पूल उद्ध्वस्त

या दोन दिवसांत चार भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. लाखोंच्या संख्येने आलेल्या भक्तांच्या व्यवस्थेसाठी प्रशासन आणि आयोजक पुरेसे सज्ज नसल्याचेही यातून दिसून येत आहे. उष्माघात, दमछाक, गर्दीत गुदमरून जाणे, अशा समस्यांमुळे ही स्थिती गंभीर बनली आहे. ही यात्रा श्रद्धेचा महापर्व आहे, पण नियोजन आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली नाही, तर भाविकांना आपला जीव गमवावा लागतो, हे वास्तव पुन्हा एकदा या घटनांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title: 4 devotees died in pradeep mishra kubereshwar dham during kawad yatra latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • madhya pradesh
  • mp police

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Push Up: राहुल गांधींना कार्यक्रमाला पोहचले उशीरा; सर्व कार्यकर्त्यांसमोरच मिळाली शिक्षा
1

Rahul Gandhi Push Up: राहुल गांधींना कार्यक्रमाला पोहचले उशीरा; सर्व कार्यकर्त्यांसमोरच मिळाली शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.