Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भर उन्हाळ्यात पश्चिम बंगालमध्ये वादळाचा कहर, जलपायगुडीमध्ये चार जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी!

या वादळामुळे राज्याच्या उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली, शेकडो झाडे आणि विजेचे खांब तुटून जमिनीवर आले. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला असून अनेक रस्तेही ठप्प झाले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 01, 2024 | 09:21 AM
भर उन्हाळ्यात पश्चिम बंगालमध्ये वादळाचा कहर, जलपायगुडीमध्ये चार जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी!
Follow Us
Close
Follow Us:

देशभरात एकीकीडे ऊन तापू लागलय.अनेक ठिकाणी लोकांना उष्माघात होण्याचं प्रमाण वाढलयं. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये लोकांना भर उन्हाळ्यात वादळाचा  (Storm in West Bengal) तडाखा बसलाय. पश्चिम बंगालमध्ये रविवारी अचानक आलेल्या वादळानं जनजीवन विस्कळीत झालं. या वादळात चार जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर, या वादळामुळे राज्याच्या उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली, शेकडो झाडे आणि विजेचे खांब तुटून जमिनीवर पडले आहेत. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला असून अनेक रस्तेही ठप्प झाले आहेत.

[read_also content=”थिएटनंतर आता ओटीटीवर अनुभवता येणार ‘शैतान’ची दहशत, जाणून घ्या चित्रपट केव्हा आणि कुठे पाहू शकता! https://www.navarashtra.com/movies/ajay-devgn-and-r-madhavan-starrer-shaitaan-ott-release-date-out-as-per-report-nrps-519369.html”]

जलपाईगुडी जिल्ह्यात मोठं नुकसान

वादळाने रविवारी उत्तर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्याच्या काही भागात नासधूस केली, अशी माहिती राज्य अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा मुख्यालय शहर आणि शेजारील मैनागुरीच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली, विजेचे खांबही पडले.

‘या’ भागात सर्वाधिक प्रभाव

राज्यात वादळाचा सर्वात जास्त प्रभावित भागात राजारहाट, बार्नीश, बकाली, जोरपकडी, माधबडंगा आणि सप्तीबारी या भागात जाणवला. येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून आता झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केलं जात आहे. अधिकाऱ्यांचे पथक मदतकार्यात गुंतले आहे. संपूर्ण परिसरात आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली आहेत. अनेकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती जाणून घेतली

वादळाच्या तडाख्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, मदतकार्यासाठी नागरी प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मदतीसाठी क्यूआरटी देखील तैनात करण्यात आले आहेत. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम  सुरू आहे.

आज दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्यामुळे जलपाईगुडी-मायनागुरीच्या काही भागात आपत्ती ओढवली, त्यामुळे मानवी जीवितहानी, दुखापत, घराचे नुकसान, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांब कोसळले हे खेदजनक आहे. जिल्हा प्रशासन मृत्यू झाल्यास तत्काळ कुटुंबाला आणि जखमींना नियमानुसार आणि MCC (मॉडेल कोड ऑफ कंडक्ट) नुसार भरपाई देईल. तो पीडित कुटुंबांसोबत आहे. प्रशासन सर्व प्रकारची मदत करेल.

Web Title: 4 people died and more than 70 injured in strom at west bengal nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2024 | 09:19 AM

Topics:  

  • Mamta Banarjee
  • national news
  • West bengal

संबंधित बातम्या

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज
1

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त
2

SRISIIM परिसरात जप्त केल्या अश्लील सीडी, लैंगिक खेळणी; Chaitanyananda चे PM Modi – Obama सह बनावट फोटो जप्त

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात;  नेमकं काय आहे खास?
3

India’s 5th Gen Fighter Jet News: भारताचे 5th Gen Fighter Jet अंतिम टप्प्यात; नेमकं काय आहे खास?

Samudrayaan Mission: काय आहे भारताचे ‘मिशन समुद्रयान’; कधी सुरू होणार, काय फायदा होणार?
4

Samudrayaan Mission: काय आहे भारताचे ‘मिशन समुद्रयान’; कधी सुरू होणार, काय फायदा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.