Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य प्रदेशच्या बालाघाटात गोळीबाराचा थरार; ४ महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

मध्य प्रदेशच्या बालाघाटात जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जंगलात चकमक झडली. या चकमकीत 4 महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 19, 2025 | 10:35 PM
जंगलात गोळीबाराचा थरार; पोलिसांच्या चकमकीत ४ महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

जंगलात गोळीबाराचा थरार; पोलिसांच्या चकमकीत ४ महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

Follow Us
Close
Follow Us:

मध्य प्रदेशच्या बालाघाटात जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जंगलात चकमक झडली. या चकमकीत 4 महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक गढी पोलीस ठाणे क्षेत्रातील रौंदा जंगलात झाली. या जंगलात नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. पोलिसांनी चकमकीत हत्यारे आणि साहित्य जप्त केलं आहे.

पोलीस आणि हॉक फोर्स जवानांनी रौंदा येथील जंगलात शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत चार महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीदरम्यान एक इंसास रायफल, एक एसएलआर रायफल आणि एक ३०३ रायफल व्यतिरिक्त अनेक साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

जंगलातील चकमकीदरम्यान काही नक्षलवादी जखमी झाले. या घनदाट जंगलाचा फायदा उचलून काही नक्षलवाद्यांनी पळ काढला. जखमी नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन सुरु केलं. पोलिसांनी या सर्च ऑपरेशनमध्ये हॉक फोर्स, सीआरपीएफ, कोबरा कमांडो आणि इतर पथकांचा सहभाग नोंदवला. एकूण १२ हून अधिक पथकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी या पथकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी अभिनंदन करत म्हटलं की, ‘मध्य प्रदेश सरकार लवकरच नक्षलग्रस्त भागातील नक्षलवाद्यांचा खात्मा करणार आहे. २०२६ पर्यंत राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यात येईल’.

जंगलातील चकमकीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जंगलात पळून गेलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेणे आव्हानात्मक आहे. चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर बालाघाट जिल्ह्यातील पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. पोलिसांनी महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

Web Title: 4 women naxals killed in police naxal clash in balaghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 10:24 PM

Topics:  

  • madhya pradesh
  • Madhya Pradesh crime
  • Naxal attack

संबंधित बातम्या

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन
1

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन

Madhya Pradesh Crime : प्रेम, विश्वासघात मग ब्लॅकमेलिंग! बेडच्या बॉक्समध्ये मृतदेह अन्…, नपुंसक काजलची थरकाप उडवणारी रक्तकथा
2

Madhya Pradesh Crime : प्रेम, विश्वासघात मग ब्लॅकमेलिंग! बेडच्या बॉक्समध्ये मृतदेह अन्…, नपुंसक काजलची थरकाप उडवणारी रक्तकथा

Rahul Gandhi News: महाराष्ट्रासह बिहारमधील मतदारयाद्या गायब? आयोगाची ‘नवी खेळी’ की आणखी काही
3

Rahul Gandhi News: महाराष्ट्रासह बिहारमधील मतदारयाद्या गायब? आयोगाची ‘नवी खेळी’ की आणखी काही

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान
4

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.