
भुवनेश्वर :ओडिशामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ओडीशात सोमवारी रात्री प्रवाशांनी भरलेली बस ओव्हरब्रिजवरून रस्त्यावर पडली. या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ओव्हरब्रिजवरून जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटून ती पुलावरून खाली पडल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
[read_also content=”शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, चार जणांचा मृत्यू, दहा विद्यार्थ्यांसह अनेक जण बेपत्ता! https://www.navarashtra.com/india/boat-sinks-in-jhelum-river-in-srinagar-drowning-many-people-including-students-nrps-524206.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, ओडीशातील राष्ट्रीय महामार्ग-16 वर सोमवारी रात्री भीषण हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली एक बस पश्चिम बंगालमधील पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया येथे जात होती. या बसमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुले असे एकूण 55 जण प्रवास करत होते. दरम्यान चालकाचं बसवरीव नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून थेट खाली पडली. इतक्या उंचीवरून बस थेट रस्त्यावर पडल्याने अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.