Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीषण अपघातात ‘मॅजिक व्हॅन’चा झाला चुराडा; लहान मुलांसह ७ जणांचा जागीच मृत्यू, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये भीषण अपघात झाला आहे. मॅजिक गाडी आणि ट्रकच्या जोरदार धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 10, 2024 | 07:59 PM
भीषण अपघातात 'मॅजिक व्हॅन'चा झाला चुराडा; लहान मुलांसह ७ जणांचा जागीच मृत्यू, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

भीषण अपघातात 'मॅजिक व्हॅन'चा झाला चुराडा; लहान मुलांसह ७ जणांचा जागीच मृत्यू, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

Follow Us
Close
Follow Us:

उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये भीषण अपघात झाला आहे. मॅजिक गाडी आणि ट्रकच्या जोरदार धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून जिल्हा प्रशासनाला सर्व ती मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

अपघातासंदर्भातील बातम्या  वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हाथरस जंक्शन पोलिस स्टेशन हद्दीतील बरेली-मथुरा रोडवरील जैतपूर गावाजवळ ही दुर्घटना घडली. आज दुपारी प्रवाशांनी भरलेल्या मॅजिक व्हॅनला एका कंटेनरने धडक दिली. टक्कर इतकी जोराची होती की व्हॅनचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मॅजिक व्हॅनमध्ये  20 प्रवासी होते. सर्व प्रवासी  चांदपा पोलीस स्टेशन हद्दीतील कुमराई गावचे रहिवासी होते. हे सर्वजण कॅन्सरने पीडित असलेल्या एका वृद्ध नातेवाईकाला पाहण्यासाठी एटा येथील नागला एमिलिया गावाला एकत्र निघाले होते. बरेली-मथुरा रोडवरील जैतपूर गावाजवळ ही दुर्घटना घडली.

कंटेनरची धडक इतकी भीषण होती की मॅजिक व्हॅन उलटून खड्ड्यात पडली. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश सुरू होता. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना व्हॅनमधून बाहेर काढले. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. तिथे एका महिलेचा मृत्यू झाला.

सध्या ६ गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयातून अधिकच्या उपचारासाठी इतर ठिकाणी पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यातील डीएम आणि इतर अधिकारी अपघाताची माहिती गोळा करत असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दुसरीकडे, हातरसमधील या दुर्घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेलती असून शोक व्यक्त केला आहे. प्रशासनाला जखमींना सर्व ती मदत करण्याच्याही सूचना केल्या आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे रस्त्यांची दुरावस्था यामुळे प्रवासी आणि गाडीचालक यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसंच ज्या रस्त्यांना अवजड वाहनांना बंदी असून देखील नियमांना न जुमानता मलवाहू ट्रकची खुलेआमपणे ये जा होत असते. यामुळे नागरिकांना स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर गेल्या आठवड्यापासून दरदिवशी अपघाताच्या दुर्घटना होत आहेत. अशातच आता रत्नागिरी जिल्ह्यात मालवाहू ट्रकला भीषण अपघात झाला आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रत्नागिरीत मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा ट्रक संगमेश्वरला जांभा चिरा घेऊन जात होता. मात्र, उक्षी रेल्वे स्टेशन जवळील उतारावर येताच या ट्रकचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकांच नियंत्रण सुटलं आणि ट्रकचा अपघात झाला. ही घटना शनिवार 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये ट्रकमधील पाचजण जखमी झाले. त्यातील एकाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारांदरम्यान एकाचा शनिवारी मृत्यू झाला.

Web Title: 7 passengers killed and 8 seriously injured in hathras accident after magic van hit container

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 06:33 PM

Topics:  

  • CM Yogi Adityanath
  • Uttar Pradesh Accident

संबंधित बातम्या

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा
1

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा

CM Yogi Death Threat: योगी आदित्यनाथांना महाराष्ट्रातून कुणी दिली जीवे मारण्याची धमकी…; नेमकं काय आहे प्रकरण?
2

CM Yogi Death Threat: योगी आदित्यनाथांना महाराष्ट्रातून कुणी दिली जीवे मारण्याची धमकी…; नेमकं काय आहे प्रकरण?

‘या’ राज्यात आता नवीन इलेक्ट्रॉनिक्स धोरण, गुंतवणूकदारांना मिळेल अनुदान आणि कर सवलत
3

‘या’ राज्यात आता नवीन इलेक्ट्रॉनिक्स धोरण, गुंतवणूकदारांना मिळेल अनुदान आणि कर सवलत

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठ धक्का! संजय निषाद घेणार काडीमोड? ‘त्या’ विधानाने राजकारण तापले
4

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठ धक्का! संजय निषाद घेणार काडीमोड? ‘त्या’ विधानाने राजकारण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.