पाटणा : बिहारच्या नव्या एनडीए सरकारमधील (Bihar NDA government)मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. एकूण नऊ नावांना मंजुरी देण्यात आली आहे. या युतीत नितीश कुमार मुख्यमंत्री (CM Nitish Kumar)असतील. भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या यादीत भाजपकडून डॉ. प्रेम कुमार, विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, जेडीयूकडून विजेंद्र यादव, अपक्ष सुमित कुमार सिंह आणि ‘हम’मधून संतोष कुमार सुमन यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. (9 names included in Bihar’s NDA government cabinet including Nitish Kumar)
एनडीए सरकारमधील नवे समीकरण
बिहारच्या राजकारणाने पुन्हा एकदा नवे वळण घेतले आहे. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले आहेत. यामुळे आता सर्व काही स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचीही घोषणा करण्यात आली असून, ते आज संध्याकाळी शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळाच्या नव्या समीकरणात नितीश वगळता जेडीयूला तीन आणि भाजपला तीन मंत्री मिळाले आहेत. याशिवाय एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या ‘हम’लाही स्थान मिळाले असून एकमेव अपक्ष सुमित कुमार सिंग यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
सायंकाळी पाच मंत्र्यांचा शपथविधी होणार
नितीश यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी आज संध्याकाळी ५ वाजता राजभवनात होणार आहे. त्याबाबतची तयारीही सुरू झाली आहे. आमंत्रणेही देणे सुरू झाले आहे. मंत्रिमंडळात असणाऱ्या सर्व नेत्यांना निमंत्रणे पाठवली जात आहेत. नितीश कुमार 9व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि माजी विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा हेही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी बिहारमध्ये या बदलासंदर्भातील जल्लोष तीव्र झाला आहे.
Web Title: 9 names included in bihars nda government cabinet including nitish kumar know names nrab