Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spain Flood : वर्षभराचा पाऊस एका दिवसात कोसळला, कित्येक शहरं, गावंच्या गावं बुलाडी; स्पेनमध्ये हाहाकार

स्पेनच्या पूर्व भागात मंगळवारी रात्री ढगफूटीसदृश्य पाऊस झाला असून त्यानंतर आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 31, 2024 | 06:08 PM
स्पेनच्या पूर्व भागात मंगळवारी रात्री ढगफूटीसदृश्य पाऊस झाला असून त्यानंतर आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला आहे.

स्पेनच्या पूर्व भागात मंगळवारी रात्री ढगफूटीसदृश्य पाऊस झाला असून त्यानंतर आलेल्या महापुरामुळे हाहाकार माजला आहे.

Follow Us
Close
Follow Us:

स्पेनच्या पूर्व भागात मंगळवारी रात्री ढगफूटीसदृश्य पाऊस झाला असून महापुरामुळे हाहाकार माजला आहे. व्हॅलेन्सिया प्रांतात आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ८ तासांत वर्षभराच्या सरासरी पावसाची नोंद झाली आहे. या चक्रीवादळाने स्पेनच्या भूमध्य सागरी किनाऱ्याचा बराचसा भाग व्यापला असून अनेक बेपत्ता झाले आहेत.

हेही वाचा-Navi Mumbai | विजय चौगुले यांचे गणेश नाईकांच्या विरोधात ऐन निवडणुकीत आंदोलन‪

अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरांमधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वाहने वाहून गेली आहेत. त्यामुळे या प्रांतातील संपूर्ण जीवन विस्कळीत झालं आहे. वाहने आणि रेल्वे मार्ग बाधित झाले आहेत. पाण्याचा जोर इतका होता की, वेलेंसिया शहरातील एक प्रमुख पूल उद्धवस्त झाला आहे . घरं आणि इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: माद्रिद आणि बार्सिलोना येथे बऱ्याच ट्रेन्स आणि इतर आवश्यक सेवा सुद्धा रद्द करण्यात आल्या.

हेही वाचा-पंजाब सरकारकडून दिवाळीचे बंपर गिफ्ट; कर्मचारी अन् पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ

मदतीसाठी सर्व यंत्रणा कार्यरत

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. पोलिसांनी हेलीकॉप्टरच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. पुरात अडकलेल्या वाहनचालकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोहचण्यासाठी जहाजांचा वापर केला जात आहे. स्पेनमधील प्रत्येक नागरिक मृतांच्या कुटुंबीयांच्या वेदनेत सहभागी आहे. आपल्या प्रियजनांचा शोध घेणाऱ्यांच्या वेदना आम्ही समजू शतको. परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व आवश्यक साधने वापरली जातील, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आहे. स्पेनमध्ये पूर आणखी काही काळ धोका निर्माण करू शकतो. काही भागात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे आणि प्रशासन सतत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.

लेतूर शरातील पूर येऊन ओसरल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक मलबा हटवण्याचे काम करत आहे. पोलीस आणि बचाव पथकांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचण्यासाठी रबर बोटीचा वापर केला. स्पेनच्या आपत्कालीन प्रतिसाद युनिटमधील १ हजाराहून अधिक सैनिक पूरग्रस्त भागात नागरिकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. लेतूरमधील बचाव कार्यात बचवलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत देत आहेत.

हवामान बदलामुले ओल्या आणि कोरड्या दुष्काळात वाढ

स्पेनमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तीव्र दुष्काळ ते विक्रमी तापमान अशा विविध हवामान बदलाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ज्याचा संबंध शास्त्रज्ञ हवामान बदलाशी जोडत आहेत. पुरामुळे माद्रिद आणि बार्सिलोना शहरांकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. स्पेनमधील व्हॅलेन्सियामध्ये लोक पूरग्रस्त रस्त्यावरून चालताना. विशेषत: दुर्गम भागात शोधकार्य सुरूच असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: 95 people died in spain deadliest flood roads closed rail services halted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 05:21 PM

Topics:  

  • Unseasonal Rain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.