पंजाबने आपचे भगवंत मान सरकारकडून कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी महागाई हफ्ता वाढवला आहेय (फोटो - सोशल मीडिया)
चंदीगड : दिवाळीच्या मुहूर्तावर विविध राज्यातील सरकारांनी नागरिकांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील सरकारनंतर आता पंजाब सरकारने नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंजाबमधील सरकारने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची दिवाळी गोड केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या हफ्त्यामध्ये वाढ केली आहे.
पंजाबच्या आप सरकारने ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंजाब सरकारने बुधवारी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर केली. “राज्य सरकारच्या 6.50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबांना दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी त्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे.
राज्य सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी 6.5 लाखांहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबांसाठी महागाई भत्ता (DA) मध्ये 4% वाढ करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी 4% DA वाढ मंजूर केली, 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू, ती 38% वरून 42% केली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
पंजाब सरकारच्या या घोषणेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अधिकची माहिती दिली. ते, “या निर्णयामुळे 6.5 लाखांहून अधिक कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना फायदा होईल. कर्मचारी हा राज्य प्रशासनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या उदात्त हेतूसाठी कोणतीही कसर सोडली जात नाही आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशा भावना भगवंत मान यांनी व्यक्त केल्या आहेत.
उत्तर प्रदेश सरकारकडून जनतेला दिवाळी गिफ्ट
पंजाब सरकारप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने देखील राज्यातील नागरिकांसाठी दिवाळीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बैठक घेत अधिकाऱ्यांना हिंदू सण उत्साहामध्ये साजरे करता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत राज्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये. सणांच्या आनंदाच्या आणि उत्सवाच्या या काळात 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात 24 तास अखंड वीज पुरवठा व्हावा अशा सूचना उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आल्या आहेत.