भगर खाल्ल्याने ५२ जणांना विषबाधा, चौघांची प्रकृती गंभीर
मैनीपूर : उत्तर प्रदेशमधील मैनीपूरमध्ये माणूसकी न दाखवणारी घटना घडली आहे. एका महिलेला हॉस्पीटलमुळे ॲम्ब्युलन्समध्येच बाळाला जन्म द्यावा लागला आहे. हॉस्पीटलने महिलेचे ऑपरेशन करण्यास नकार दिला. यामुळे तिची प्रसुती ॲम्ब्युलन्समध्येच झाली. भूल देणारे तज्ज्ञ डॉक्टर आले नसल्यामुळे महिलेला हॉस्पीटलमध्ये घेण्यास नकार दिला. या प्रकारामुळे हॉस्पीटलचा भोंगळ कारभार उघडकीस आला असून यावर कायदेशीर मार्गाने पाऊल उचलण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील मैनपुरी भागातील “सौसैया मातृ शिशू चिकित्सालय” नया हॉस्पीटलमध्ये सदर प्रकार घ़डला आहे. भूलतज्ज्ञ नसल्यामुळे आईला दुसऱ्या रुग्णालयात पाठवले. त्यांनी प्रसुती करण्यास नकार दिला. यामध्ये महिलेची ॲम्ब्युलन्समध्ये प्रसुती झाली. या प्रकारामुळे सर्वांनी रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये बाळाच्या वडीलांनी हॉस्पीटलवर आरोप केले असून पुढील तपास देखील केले जात आहे.
बाळाच्या वडीलांच्या म्हणण्यानुसार, सदर हॉस्पीटलने सुरुवातीला महिलेची प्रसुती नैसर्गिकरित्या करता येणार नाही, असे सांगितले होते. प्रसुतीमध्ये गुंतागुंत वाढल्यामुळे महिलेचे ऑपरेशन करावे लागेल असे हॉस्पीटलकडून सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र त्यानंतर, रुग्णालयाकडून सांगण्यात आले की भूलतज्ज्ञ उपस्थित नाही. आणि भूल देणारे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे महिलेचे ऑपरेशन केले जाऊ शकत नाही, त्यानंतर आईला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र वाटेतच आईने रुग्णवाहिकेत बाळाला जन्म दिला.
तपास सुरु
या घटनेमुळे रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आर सी गुप्ता यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, “संबंधित व्यक्तीने तक्रार नोंदवली होती आणि त्यासाठी दोन सदस्यीय तपास समिती बनवली आहे. एका आठवड्यात ते अहवाल सादर करतील, आणि त्यानंतर पुढील तपास केला जाईल.” असे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.