Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Assembly Election 2025: आपचा दावा, ‘इतक्या’ जागांवर होणार विजय..; एक्झिट पोलनंतर वाढलं भाजपचं टेन्शन

आता प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच दिल्लीच्या सत्तेवर कोण येणार? 'आप' पुन्हा एकदा विजय मिळवणार का? की भाजपला ऐतिहासिक यश मिळणार? हे स्पष्ट होईल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 07, 2025 | 05:13 PM
Delhi Assembly Election 2025: आपचा दावा, ‘इतक्या’ जागांवर होणार विजय..; एक्झिट पोलनंतर वाढलं भाजपचं टेन्शन
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली  :  दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एग्जिट पोलमध्ये ‘आप’ला धक्का बसला असला तरी पक्षाने मोठा दावा केला आहे. आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये ‘आप’ 50 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवणार आहे आणि सरकार स्थापन करणार आहे.’आप’च्या अंतर्गत अहवालानुसार, पक्षाला 50  पेक्षा जास्त जागा मिळतील. एवढेच नाही तर, गोपाल राय यांचा दावा आहे की दिल्ली विधानसभा निवडणुकीत7-8  जागांवर जवळची लढत दिसून येते, म्हणजेच ‘आप’ला येथेही यश मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या वेळी पक्षाने दिल्लीत 67  जागा जिंकल्या होत्या.

गोपाल राय यांचा आरोप – एग्जिट पोलच्या मदतीने ऑपरेशन लोटस!

अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर गोपाल राय म्हणाले, “एग्जिट पोलच्या माध्यमातून चुकीचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप ऑपरेशन लोटसच्या मदतीने विजय मिळवू इच्छित आहे. मात्र, आमचे सर्व उमेदवार मतमोजणीची तयारी करत आहेत. आम्ही सरकार बनवणार आहोत. उद्या भाजपची खरी परिस्थिती स्पष्ट होईल.”

Jammu-Kashmir News: जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या 7 दहशतवाद्यांना कंठस्नान

एग्जिट पोलमध्ये कोणते आकडे?

दिल्लीतील बहुतांश एग्जिट पोल भाजपला विजय मिळेल, असे दर्शवत आहेत.

  • ऍक्सिस माई इंडिया सर्वेक्षणानुसार:
    • भाजप – 45 ते 55 जागा
    • आप – 15 ते 25 जागा
    • काँग्रेस – 0 ते 1 जागा
  • CNX सर्वेनुसार:
    • आप – 10 ते 19 जागा
    • भाजप – 49 ते 61 जागा
    • इतर – 0 ते 1 जागा
  • DV रिसर्चनुसार:
    • आप – 26 ते 34 जागा
    • भाजप – 36 ते 44 जागा

भाजपचा दावा – 50+ जागांवर विजय!

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. एग्जिट पोलमधील आकडे पाहता भाजपला आत्मविश्वास आला आहे. पक्षाने 50 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा दावा केला आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले नव्हते.

  • 2020 मध्ये भाजपला फक्त 8 जागा मिळाल्या होत्या, तर ‘आप’ने 62 जागांवर विजय मिळवला होता.
  • 2015 मध्ये ‘आप’ने तब्बल 67 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजप केवळ 3 जागांवर विजयी झाला होता.

Delhi Assembly Election 2025: राजकारण तापणार…! भाजपच्या तक्रारीनंतर ACBचे पथक अरविंद केजरीवालांच्या घरी दाखल

दरम्यान, आजच्या बैठकीत पक्षाच्या उमेदवारांनी त्यांचे ग्राउंड रिपोर्ट सादर केले. शनिवारी मतमोजणीपूर्वी सर्व पक्षाच्या उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीत, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, पक्ष दिल्लीत सरकार स्थापन करण्यास तयार आहे. ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याच्या प्रयत्नात विरोधी पक्ष मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी ‘एक्झिट पोल’चा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

बैठकीनंतर बोलताना राय म्हणाले, “केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व उमेदवारांनी त्यांचे ग्राउंड रिपोर्ट सादर केले, जे सूचित करतात की ‘आप’ ५० हून अधिक जागांवर निर्णायक विजय नोंदवणार आहे, तर सात-आठ जागांवर कठीण लढत आहे.” राय यांनी असाही दावा केला की विरोधी पक्ष ‘एक्झिट पोल’ वापरून चुकीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच दिल्लीच्या सत्तेवर कोण येणार? ‘आप’ पुन्हा एकदा विजय मिळवणार का? की भाजपला ऐतिहासिक यश मिळणार? हे स्पष्ट होईल.

Web Title: Aap confident of winning so many seats bjps tension increases after exit polls nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Delhi Assembly election 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.