Photo Credit- Social media भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या सात दहशतवाद्यांना भारतीय लष्कराकडून कंठस्नान
जम्मू-कश्मीर: जम्मू-कश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत घुसखोरी करणाऱ्या ७ दहशतवाद्यांना ठार मारले. या कारवाईत २ ते ३ पाकिस्तानी सैनिक देखील सामील होते. ही घटना ४-५ फेब्रुवारीच्या रात्री नियंत्रण रेषेवर (LOC) घडली.
पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने हल्ल्याची तयारी
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिल्लेल्या अहवालानुसार, हे घुसखोर पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) सोबत मिळून भारतीय सुरक्षादलांवर घातपात करण्याच्या तयारीत होते. पाकिस्तानी BAT कडून यापूर्वी देखील भारतीय सैनिकांवर छुप्या हल्ल्यांचे प्रयत्न करत आला आहे. विशेष म्हणजे, ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतासोबत काश्मीरसह सर्व मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Arvind Kejriwal on BJP: आमच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी भाजपचे फोन; केजरीवालांचा भाजपवर गंभीर आरोप
अल-बदर संघटनेचे दहशतवादी ठार
या कारवाईत मारल्या गेलेल्या घुसखोरांमध्ये हशतवादी संघटना ‘अल-बदर’चे सदस्य देखील होते. विशेष म्हणजे, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लाहोरमध्ये झालेल्या एका रॅलीत दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदने भारताविरोधात भडकाऊ भाषण दिले होते. त्याने काश्मीरला ‘मुक्त’ करण्याचा’ उल्लेख केला होता.
गृहमंत्र्यांकडून घुसखोरी रोखण्यासाठी कठोर निर्देश
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ५ फेब्रुवारीला सर्व सुरक्षा यंत्रणांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले होते. त्यांचे स्पष्ट मत होते की घुसखोरी पूर्णतः शून्यावर आणण्याचे लक्ष्य पूर्ण केले पाहिजे. अमित शाह यांनी घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून, दहशतवाद्यांचे अस्तित्व पूर्णतः नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच, मादक पदार्थांच्या तस्करीचे नेटवर्कही या घुसखोर आणि दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
उच्चस्तरीय सुरक्षा बैठक
या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका, जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक (DGP) नलिन प्रभात, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर वरिष्ठ सैन्य, पोलीस व नागरी अधिकारी सहभागी झाले होते. ही कारवाई भारतीय सुरक्षादलांसाठी मोठे यश असून, घुसखोरी थांबवण्यासाठी भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट संकेत आहेत.